Ajit Pawar Vs Jayant Patil : अजितदादांनी वाढवली जयंत पाटलांची धडधड; थेट 'होमग्राऊंड'वरच सुरु केलं पक्षाचं कार्यालय

NCP Politics : जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची एन्ट्री, अजित पवार सोमवारी सांगली जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत.
Ajit Pawar and Jayant Patil
Ajit Pawar and Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी पहिल्यांदाच सांगली जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या इस्लामपुरात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन स्वतः अजित पवार करणार आहेत. जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची एन्ट्री होणार असल्यामुळे जयंत पाटलांसाठी हा धक्का मानला जात आहे. सांगलीत आल्यानंतर आता अजित पवार नेमकं काय बोलतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Ajit Pawar Vs Jayant Patil)

जिल्ह्यातील शेतकरी मेळावे आणि पक्ष प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. वाळवा तालुका हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. तालुक्यावर जयंतरावांची पकड असल्याने विरोधकांना हातपाय पसरायला वाव नाही. जयंत पाटील यांच्या विरोधात अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले, परंतु यश आलेले नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर सांगली जिल्ह्यातील राजकारणही बदलत आहे. अजित पवार गट सांगली जिल्ह्यातही स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar and Jayant Patil
Ganpat Gaikwad Firing Case : आमदार गणपत गायकवाडांनंतर आता कार्यकर्तेही अडचणीत; गुन्हा दाखल

जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील असले तरीही त्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. मागील आठवड्यात वाळवा तालुक्यातील काही पदाधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली होती. पवार यांचे वाळव्यावर विशेष लक्ष आहे. त्यावेळी तालुक्यातील बहुतांशी पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत.

आगामी सर्व निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सामोरे जाणार आहे. त्यामुळे कार्यालय सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. इस्लामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत कार्यालय सुरु केले जाणार असून त्याचे उद्घाटन अजितदादा स्वतः करणार आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) हे जयंत पाटील यांच्या 'होमग्राऊंड'वर जावून स्वतःच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील पक्षप्रवेश, बैठका व मेळावा रद्द केले करण्यात आले आहेत. विटा येथे दिवंगत आमदार बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यानंतर खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थिती लावून परतणार आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

Ajit Pawar and Jayant Patil
Jitendra Awhad : अजित पवारांच्या 'त्या' विधानावर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, "लाज वाटते तुमच्याबरोबर..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com