Ajit Pawar-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar CM Post : अजित पवार महाआघाडीसोबत असते तर मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांचे सूचक विधान

Jayant Patil's suggestive statement : अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपसोबत गेल्याची चर्चा होती. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्दही भाजपच्या नेतृत्वाकडून दिला आहे, असेही बोलले जात होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा तसा दावा केला होता.

भारत नागणे

Pandharpur, 12 August : अजित पवार हे महाविकास आघाडीसोबत असते‌ तर तुम्हाला ते भविष्यात मुख्यमंत्री झालेले दिसले असते, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे अकलूजमध्ये आले होते. त्या वेळी माध्यमाशी बोलताना जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले.

अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी (Chief Minister) भाजपसोबत गेल्याची चर्चा होती. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्दही भाजपच्या नेतृत्वाकडून दिला आहे, असेही बोलले जात होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा तसा दावा केला होता. मात्र, अजूनही तरी अजितदादांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विधानाला महत्व प्राप्त होत आहे.

महाराष्ट्रात लोकशाही असून सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोणी काही बोललं; म्हणून लगेच एकमेकांच्या गाड्यावर शेण आणि सुपाऱ्या फेकणं हे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. अशा राज्यात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चुकीचं कृत्य करणे, हे बरोबर नाही,असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्याबाबात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळी त्यांनी थेट भाष्य न करता गोलमाल उत्तर दिले.

महाविकास आघाडीचे सरकार आले तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार का, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर जयंत पाटील यांनी थेट उत्तर दिले नाही. मराठा आरक्षणावर महायुतीचे सरकार काय निर्णय घेते हे पाहू. त्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करू, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT