Solapur, 13 April : नाशिकच्या अशोक खरात याने हातचलाखी करून कमावलेले पैसे अनेक ठिकाणी गुंतवल्याचे दिसून येत आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादीत होणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील जमिनीचे त्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे पुढे आले आहे. खरातबरोबरच माजी आमदार दीपक साळुंखे, निवृत्त अधिकारी आणि उद्योजकांनी तब्बल 17 कोटी रुपये गुंतवून 80 एकर जमीन विकत घेतल्याचे समोर येत आहे, त्यामुळे खरातसोबत या लोकांचे काय हितसंबंध आहेत का?, असा सवाल चर्चिला जात आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार होता. त्याच्या रेखांकनाची माहिती अनेक मंत्र्यांसह बड्या अधिकाऱ्यांसोबत उसबठ असलेल्या खरातला मिळाली होती. त्यामुळे खरात याने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात जमीन खरेदी केली होती.
रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांच्या मालकीची उत्तर सोलापूर तालुक्याच्या कळमण हद्दीतील 11 एकर जमीन 28 मार्च 2024 रोजी अशोक खरात (Ashok Kharat) आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांनी खरेदी केली आहे. तशी नोंद कळमण हद्दीतील महसुली दफ्तरी आढळून येते.
केवळ खरात यानेच नाही तर सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावेही जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. खरातच्या शेजारीच साळुंखे यांच्या पत्नीच्या नावेही जमिनीची खरेदी झालेली आहे.
निवृत्त परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमोटे आणि त्यांची दोन मुले पृथ्वीराज आणि प्रतीक यांच्या नावाने 21 एकर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. याशिवाय मोनिका ललित पोफळे, सुलभा सुषमा लोढा, डिंपल मनोज ओसवाल, मनोज रामचंद्र ओसवाल यांनीही उत्तर सोलापूर तालुक्यात जमिनी खरेदी केल्याचे महसूल नोंदीवर लक्षात येते.
अशोक खरात याच्यासोबत नेते, अधिकारी, उद्योजक यांनीही प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणाऱ्या जमिनीची अगोदरच खरेदी केल्याचे उघड झाले आहे. म्हणजे या सर्वांचे लागेबांधे मंत्रालयापर्यंत पोचतात, त्यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह नेतेमंडळी, उद्योजकांचा खरात याच्याशी काय संबंध येतो का, याचीही उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.