Ambadas Danve Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ambadas Danve Aggressive : दानवेंनी कोल्हापुरात येऊन थेट 'या' नेत्याला दिलं आव्हान; म्हणाले, मस्ती चालणार नाही...

Rajesh Kshirsagar : वरपे कुटुंबीयांसाठी दानवेंनी घेतला पोलिसप्रमुखांशी पंगा

Rahul Gadkar

Kolhapur Political News :

कोल्हापुरातील वरपे कुटुंबीयांना घरात येऊन मारहाण करण्याचे राजेश क्षीरसागर यांचे प्रकरण गाजले होते. क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असून, शिवसेनेचे (शिंदे) नेते आहेत. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापुरात आक्रमक झाले होते.

राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वरपे कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण केली होती. कोल्हापूर (Kolhapur) शासकीय विश्रामगृहात दानवेंनी जनता दरबार घेतला. यात वरपे कुटुंबीय न्याय मागण्यासाठी आले होते. या वेळी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांची फोनवरून चांगलीच खरडपट्टी केली.

पोलिसांकडून राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद होण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने दानवेंनी स्वतः जिल्हा पोलिसप्रमुखांना संपर्क करत चांगलाच दम दिला. क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करून तत्काळ कारवाई करण्याचे सांगत त्यांना चांगलेच सुनावले.

शिवसेना (Shivsena) नेते राजेश क्षीरसागर यांनी घरगुती वादावरून अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांच्या घरात घुसून वरपे कुटुंबास का मारहाण केली होती. याला तीन महिने उलटूनही क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. त्यावर आज वरपे कुटुंबाने अंबादास दानवेंची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन व्यथा मांडली.

वरपे कुटुंबीयांचे ऐकल्यानंतर दानवेंनी थेट जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि राजेश क्षीरसागर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करत नसल्याचा जाब विचारला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसप्रमुखांची खरडपट्टी

नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण आहे? वरपे कुटुंबीयांना मारहाण केली, त्याच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही? क्षीरसागर यांच्या बापाची जहागीर आहे का? तुम्ही आरोपीला संरक्षण देता का? या शब्दांत दानवेंनी पोलिसप्रमुखांची खरडपट्टी काढत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलिसांची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही. तत्काळ गुन्हा दाखल झाला नाही, तर येणाऱ्या अधिवेशनात तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकीच अंबादास दानवेंनी जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांना दिली आहे.

खरडपट्टीची दखल

पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांना दानवेंनी जाब विचारल्यानंतर पुढच्या 10 मिनिटांत डीवायएसपी अजित टिके शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यांना वरपे कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेऊन क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, वरपे यांच्या घरी जाणार असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केल्यानंतर क्षीरसागर यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला आहे. क्षीरसागर आणि वरपे एकाच इमारतीत राहात असल्याने तणाव नको म्हणून पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT