Kolahapur News : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ. प्रशांत कोरटकरला येणाऱ्या पाच मार्चपर्यंत अटक करावी. अन्यथा सहा मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून जाब विचारू, असा इशारा कोल्हापुरातील शिवप्रेमींनी दिला आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. कोल्हापुरात देखील गुरुवारी शिवप्रेमींकडून कोरटकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी या कृत्याचा निषेध केला.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा निषेध केला पाहिजे. त्यांना योग्य शासन झाले पाहिजे. प्रशांत कोरटकर यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणीही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली.
कोरटकर याला पोलीस संरक्षण असताना तो गायब होतो, याचा अर्थ पोलिसांचे त्याला संरक्षण आहे. सहा तारखेपर्यंत कारवाई नाही केली तर तुम्हाला कोल्हापुरात आडवू , असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जिल्हा पोलीस प्रमुखांना फोनवरून ताबडतोब याची चौकशी करण्याच्या आदेश देतात. मात्र, कोरटकर याला अद्याप अटक झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कोरटकरला अटक करावी. अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.