Eknath Shinde : "ते व्यासपीठ चुकीचं होतं की..." नीलम गोऱ्हेंच्या 'मर्सिडीज' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde reaction On Neelam Gorhe's statement : "शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं"; असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं. गोऱ्हेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ठाकरेंची शिवसेना तुटून पडली होती. तर शरद पवार यांनी देखील गोऱ्हेंचे वक्तव्य मुर्खपणाचे असल्याचं म्हटलं आहे.
Uddhav Thackeray, Neelam Gorhe, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Neelam Gorhe, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 26 Feb : दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात बोलताना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोपी केला होता.

"शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं"; असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं. गोऱ्हेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ठाकरेंची शिवसेना तुटून पडली होती. खासदार संजय राऊत (Sanjay Raut), सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर तिखट टीका केली. जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील गोऱ्हेंचे वक्तव्य मुर्खपणाचे असल्याचं म्हटलं आहे.

शिवाय ठाकरे सेनेकडून त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. चहुबाजूंनी गोऱ्हेंवर टीका होत असताना शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मात्र गोऱ्हेंची पाठराखण केली आहे. नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची झोंबली, असा टोला शिंदेंनी ठाकरे गटाला लगावला.

Uddhav Thackeray, Neelam Gorhe, Eknath Shinde
Mahavikas Aaghadi: महायुती सरकारमधील एकापाठोपाठ दोन मंत्री अडचणीत, नेत्यांची पळवापळवी जोरात, तरी 'मविआ'चा 'सायलेंट मोड'

अंधेरी येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "नीलम गोऱ्हेंनी दिल्लीच्या व्यासपीठांवरून एक वाक्य बोलल्या. ते व्यासपीठ चुकीचं होतं की बरोबर? हा भाग वेगळा. पण ते काही जणांना एवढं झोंबलं की मिरच्या लागल्या.

हा एकनाथ शिंदे त्यांना पुरुन उरला होता. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले त्यामुळेच त्यांना मिरची झोंबली." तर नीलम गोऱ्हेंच्या आधीही अनेकांनी याबाबत वक्तव्य केल्याचंही शिंदेंनी सांगितलं. ते म्हणाले, त्यांना खोके नाही कंटेनर लागतात असं राज ठाकरे बोलले होते. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे असे अनेकजण बोलले आहेत.

Uddhav Thackeray, Neelam Gorhe, Eknath Shinde
Mumbai Metro : मेट्रोच्या कामात MMRDA चा खोडा? अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा 'सिस्ट्रा' कंपनीचा आरोप, हायकोर्टाकडून 'ती' नोटीस रद्द

हे नवीन नाही. पण नीलमताई बोलल्यानंतर त्यांच्यावर इतक्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं, त्यांना शोभत नाही. त्या खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. आम्ही देना बँक आहोत आणि समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे, असं म्हणत शिंदेंनी त्यांची पाठराखण करत ठाकरेंवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com