अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर भोंदूबाबांविरोधात संताप वाढला आहे.
पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये एका आजोबांनी फसवणूक करणाऱ्या बाबाला मारहाण केली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठी चर्चा सुरू आहे.
Pune News : राज्यात नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणाने राजकीय धुरळा उडवून दिला असतानाच सर्वसामान्य नागरीकांमध्ये मात्र याप्रकरणी संतापाची लाट उठताना दिसत आहे. नाशिकनंतर आता नवी मुंबई, नांदेडनंतर आता पुण्यातही भोंदूबाबाचे पितळ उघडे पडल्याने नागरीकांच्या संपाताचा उद्रेक झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात बुवाबाजी आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबांना एका आजोबांनी चोप दिला आहे. या भोंदूबाबांना हाताने आणि काठीने चांगलाच मार देण्यात आला असून आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खरातचे काळे कारनामे आणि राजकीय नेत्यांची नावे समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. अशातच राज्यभर खरातनंतर अनेक बुवाबाज आणि भोंदूबाबांचे पितळ उघडे पडत असल्यानेही नागरिकांमध्ये रोष पहायला मिळत आहे. दरम्यान पुण्याच्या खेड तालुक्यातही भोंदूबाबांविरोधात नागरिकांमध्ये उद्रेक झाल्याचे समोर आले आहे.
व्हायरल व्हिडीओ हा खेड तालुक्यातील पाईट-सावंतवाडी परिसरातील असून दोन भोंदुबाबांना एका वयोवृद्धाने मारहान केल्याचे दिसत आहे. तर एका महिलेची पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या दोन्ही भोंदूबाबांवर करण्यात आला आहे.
ही बाब त्या आजोबांच्या लक्षात येताच त्यांनी या फिरस्त्या दोन्ही भोंदूबाबांना रस्त्यात गाठत कानाखाली वाजवली आहे. तसेच काठीने मारहाण केली आहे. यावेळी दोन्ही भोंदुबाबा झालेल्या चुकीसाठी माफी मागून सोडून देण्याची विनंती करताना दिसत असून अजोबांनी मात्र हाताने आणि काठीने प्रसाद देत दोन्ही भोंदुबाबा चांगलाच धडा शिकवला आहे.
तर भोंदू खरातच्या प्रकरणानंतर ग्रामीण भागातील जनतेचा साधूंवरील विश्वास आता पूर्णपणे ढासळला असून नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. तर भोंदूबाबांविरोधात संताप व्यक्त करत आहेत. यामुळे तथाकथित महाराजांना आपली दुकाने बंद करावी लागली आहेत. तर काही ठिकाणी भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरीकांचा संयम सुटताना दिसत आहे. अशा भोंदूबाबांना दिसताच क्षणी चोप दिला जात असल्याचे समोर आले आहे.
1. ही घटना कुठे घडली?
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ही घटना घडली.
2. कोणाला मारहाण करण्यात आली?
फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला एका आजोबांनी मारहाण केली.
3. ही घटना का घडली?
धर्माच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या आरोपामुळे नागरिक संतापले.
4. व्हिडीओबाबत काय माहिती आहे?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
5. या प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो?
भोंदूबाबांविरोधात अधिक कठोर कारवाई आणि जनजागृती वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.