Crime sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सहाय्यक फौजदाराने केला युवतीचा विनयभंग; कराड पोलिसात तक्रार दाखल

या घटनेची फिर्याद पीडितेने कराड शहर पोलिस ठाण्यात Karad City Police station दिल्यानंतर रात्री उशीरा हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे Borgaon Police station वर्ग करण्यात आला.

सरकारनामा ब्युरो

कराड : सातारा येथे पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदाराने स्पर्धा संपल्यानंतर कोल्हापूरला परत जाताना चालत्या बसमध्ये एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली. महामार्गावर वळसे ते काशीळ दरम्यान ही घटना घडली. पीडित युवतीने याबाबत कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

ही फिर्याद शुन्य क्रमांकाने सोमवारी रात्रीउशीरा कराड शहर पोलिस ठाण्याकडून बोरगाव पोलिस ठाण्यात वर्ग झाली आहे. महेश मारुती मगदूम असे त्या सहाय्यक फौजदाराचे नाव असुन तो कोल्हापूर पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे.

याबाबत बोरगांव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन युवती ही सातारा शहरातील असून ती शिक्षणासाठी कराड येथे राहायला आहे. सोमवारी पीडित युवतीची परीक्षा असल्याने सकाळी साडे आठ वाजता बारामती-कोल्हापूर बसने कराडकडे जायला निघाली होती. काही वेळात एक अनोळखी इसम तिच्या शेजारी येऊन बसला.

त्यानंतर संबंधिताने या युवतीस नाव, गाव विचारत बोलण्यास सुरवात केली. त्याने आपण कोल्हापूरला पोलिस असल्याचे सांगून "आपण फ्रेंड्स बनू, चॅटिंग करू" असे बोलून मोबाईल नंबर मागितला. पीडितेने नंबर देण्यास नकार देत कानात हेडफोन घालून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळात त्याने तिच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे चाळे सुरू केले.

यावेळी काशीळ गावाजवळ पीडितेने संबंधिताला दुसऱ्या ठिकाणी बसण्यास सांगितले. दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती पीडितेने कराड येथील वर्गमित्र व कुटुंबियांना दिली. त्यानंतर कराड बसस्थानकातील पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यावर त्याचे नाव महेश मारुती मगदूम असल्याचे व तो कोल्हापूर पोलिस असल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेची फिर्याद पीडितेने कराड शहर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर रात्री उशीरा हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. संशयित सहाय्यक फौजदार महेश मगदूम याला बोरगाव पोलिसांनी नोटीस दिली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक चेतन मछले करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT