AY Patil KP Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur politics : मेव्हण्या-पाहुण्यांच्या वादाला पुन्हा धुमारे फुटले; एवाय पाटलांविरोधात केपी पाटील गटाच्या तक्रारी सुरू

AY Patil Set to Join NCP Ahead of Gokul Dairy Election KP Patil Raises Objections : कोल्हापूरच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ए. वाय. पाटील राष्ट्रवादी पक्षात पु्न्हा येत असतानाच, के. पी. पाटील गटाकडून तक्रारी सुरू झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

AY Patil KP Patil controversy : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मेव्हण्या-पाहुण्यांच्या वादाला पुन्हा धुमारे फुटले आहेत.

ए. वाय. पाटील गोकुळ निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात घर वापसी करण्याच्या प्रयत्नात असल्याने, त्यांच्यामुळे अडचण होणाऱ्या तक्रारी के. पी. पाटील गटाच्या राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यातून होऊ लागल्या आहेत . यामुळे पाहुण्यांचा वाद संवादात रूपांतरित होणार की, पुन्हा धुमसणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचा दावेदार असलेले ए. वाय. पाटील यांना पक्षाकडून तोंडघशी पडावे लागले. सातत्याने जिल्हा बँकेचे नेतृत्व आणि विधानसभेची स्वप्न पाहणारे पाटील यांना संधी देणे दूरच, विचारातही न घेतल्यामुळे त्यांनी अपक्षाचा झेंडा हाती घेतला. त्याचा परिणाम म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) गटातून राष्ट्रवादी पदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले. शिवाय विधानसभेच्या निवडणुकीत ही अपेक्षेपेक्षा खूपच दूरवर त्यांना मताधिक्य घेऊन गेले. परिणामी गट सांभाळण्याची कसरत त्यांच्यावर येऊन ठेपली.

दुसरीकडे त्यांचे मेहुणे माजी आमदार के. पी. पाटील यांनीही शिवसेनेतून (Shivsena) उमेदवारी घेऊन आपले नशीब पुन्हा पणाला लावले. त्यांनाही ठोकर बसली. या सर्व कसरतीत मेहुण्या पाहुण्यांच्या मध्ये वितृष्ट कायम राहिले. आता अजित पवार गटामध्ये येण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. अजित पवार गट व्हाया हसन मुश्रीफ, असा त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. संपर्कही झाले आहेत. असे असले तरी राधानगरी तालुक्यातून के. पी. पाटील यांचे कार्यकर्ते ए. वाय. पाटील यांच्या प्रवेशाबाबत नाराज आहेत.

के. पी. पाटील यांच्या एका शिष्टमंडळाने मुश्रीफ यांची भेट घेत, त्यांच्यामुळे होणाऱ्या अडचणीचा पाढा वाचला. आणि राजकीय खच्चीकरण करून कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर पाय देण्याचे प्रकार त्यांच्याकडून सातत्याने घडल्याचे सुर मांडण्यात आल्याचे समजते. सध्या ए. वाय. पाटील हे 'ना घर का ना घाट का' अशा स्थितीत आहेत. बिद्रीच्या निवडणुकीत आबिटकर गटाशी हात मिळवणी केली, तिथे मिळालेले अपयश आणि नंतर विधानसभा निवडणुकीत डावल्याने झालेला अपमान यामुळे कार्यकर्ते एकसंघ ठेवण्यात तेही त्यांची पिछेहाट झाल्याचे स्पष्ट दिसून येते.

आता कोणता तरी एक प्रबळ गट आणि पक्ष जवळ केल्याशिवाय बळ येणार नाही. गोकुळ लाही सुकर ठरेल, यामुळे त्यांनी पुन्हा घर वापसीचा निर्णय घेतला आहे. मात्र तो मार्ग सुकर दिसत नाही. एक तर मेहुण्या-पाहुण्यांना जुळते घ्यावे लागेल किंवा संघर्ष करून पुन्हा बंड करण्यासाठी दंड थोपटावे लागतील . हातात शिवबंधन बांधून के. पी. पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवारी घेतली असली तरी त्यांचे कार्यकर्ते हे आज मुश्रीफ यांच्या सोबत आहेत. मी एकट्याने शिवबंधन बांधले माझ्या कार्यकर्त्यांनी नाही ही त्यांची जाहीर भूमिका दुटप्पी मानली जात आहे .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT