Babanrao Shinde- Vijayshinh Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politic's : तुतारीच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटलांशी जुळवून घेऊ; बबनराव शिंदेंची तहाची भाषा

Babanrao Shinde Vs Mohite Patil : आमदार बबनराव शिंदे यांच्या मोहिते पाटील यांच्यासंदर्भातील विधानामुळे मोहिते पाटील आणि शिंदे कुटुंबीयांत असलेला 15 वर्षांनंतरचा राजकीय संघर्ष मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारत नागणे

Pandharpur, 21 October : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी शिंदे पिता-पुत्र रविवारी दिवसभर मुंबईत तळ ठोकून होते. दरम्यान, तुतारीच्या उमेदवारीसाठी आमदार बबनराव शिंदे हे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक मोहिते पाटील यांच्याशी जुवळून घ्यायलाही तयार आहेत. तसे विधान त्यांनी पंढरपुरात बोलताना केले आहे.

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांच्या मोहिते पाटील यांच्यासंदर्भातील विधानामुळे मोहिते पाटील आणि शिंदे कुटुंबीयांत असलेला 15 वर्षांनंतरचा राजकीय संघर्ष मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रणजितसिंह शिंदे यांना माढ्यातून तुतारीची उमेदवारी मिळणार असेल तर प्रसंगी मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्याशी जुळवून घेऊ, असे विधान आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, माढ्यातून रणजितसिंह शिंदे हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहितीही आमदार बबनराव शिंदे यांनी दिले.

माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची, असा प्रश्न पक्षापुढे आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. दुसरीकडे आमदार बबनराव शिंदे यांना मुलाला निवडून आणायचे आहे, त्यामुळे माढ्यातील उमेदवारीचा तिढा कायम आहे.

दरम्यान, माढ्याच्या उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर पुत्र रणजितसिंह शिंदे यांचा येत्या २४ तारखेला गुरु पुष्यामृत मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता माढ्याची उमेदवारी कोणत्या रणजितसिंहांना मिळणार,उत्सुकता वाढली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आमदार बबनराव शिंदे उद्या पुन्हा मुंबईत भेट घेणार आहेत. उमेदवारीसंदर्भात त्या ठिकाणी पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तर राजकीय विरोधक असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाशी जुळवून घेऊन सोलापूर जिल्ह्यात काम करण्यात येईल, असेही आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

आम्ही शरद पवार यांच्यासोबत ४० वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे, त्यामुळे आम्हाला तुतारीची उमेदवारी हवी आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून आम्हाला निवडणूक लढवायची आहे. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मध्यंतरी आम्ही अजित पवरांसोबत गेलो होतो.

महायुतीकडून निवडणूक न लढवता शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शरद पवारांनी उमेदवारी दिली तर ठीक नाही तर मुलगा रणजितसिंह शिंदे हा माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवेल, असेही बबनराव शिंदे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT