Sangola Politic's : डॉ. बाबासाहेब देशमुखांनंतर दीपक साळुंखेंनीही घेतली पवारांची भेट; सांगोल्याबाबत उत्सुकता वाढली

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष असल्यामुळे ठाकरे गटाच्या भूमिकेपुढे ते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dr Babasaheb Deshmukh- Deepak Salunkhe-Sharad Pawar
Dr Babasaheb Deshmukh- Deepak Salunkhe-Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sangola, 21 October : काँग्रेस आणि शिवसेनेत विदर्भातील जागांवरून वाद असतानाच आता सांगोला मतदारसंघावरूनही शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रामायण घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी रविवारी (ता. 20 ऑक्टोबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.

त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही आज सकाळीच पवारांची भेट घेत चर्चा केली. त्यामुळे सांगोला मतदारसंघाचा तिढा कायम असून हा मतदारसंघ कोणाला सुटणार, याची उत्सुकता वाढली आहे.

माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe ) यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशवेळीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आता तुम्ही जोरात कामाला लागा,’ असे सांगितले होते.

खासदार संजय राऊत यांनी सांगोल्याची (Sangola) जागा ही शिवसेनेची असून आम्ही ती जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमधून माजी आमदार दीपक साळुंखे यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा रंगली होती. पण, महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष असल्यामुळे ठाकरे गटाच्या भूमिकेपुढे ते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dr Babasaheb Deshmukh- Deepak Salunkhe-Sharad Pawar
Narsayya Adam Master : जागावाटपाआधीच आडम मास्तरांनी उडविला बार; उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखच जाहीर केली!

सांगोल्याच्या जागेमुळे महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू असतानाच शेकापच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी रविवारी (ता. २० ऑक्टोबर) शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती, तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार साळुंखे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Dr Babasaheb Deshmukh- Deepak Salunkhe-Sharad Pawar
Solapur BJP: फडणवीसांच्या मनात काय...? विद्यमान तीन आमदारांना वेटिंगवर का ठेवले?

या भेटीबाबत साळुंखे यांना म्हणाले शरद पवार यांच्यासोबत माझी सांगोल्याच्या जागेवरून सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली आहे. या भेटीबाबत मी सांगोल्यात आल्यावर सविस्तर बोलेन, असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com