Chhagan Bhujbal, Sharad Pawar, Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : '...मात्र ते तेवढ्यासाठीच भेटले का? हा प्रश्न आहे' भुजबळ-पवारांच्या भेटीवर थोरातांचं मोठं विधान!

Balasaheb Thorat on Bhujbal and Pawar Meeting : 'सध्या महायुतीत बरीच गडबड सुरु आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत' असंही बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवलं आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Congress leader Balasaheb Thorat at Karad News : शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट जातीय तेढ निर्माण होवू नये यासाठी भेटले असतील तर आनंदच आहे. जाती-जातीत तेढ निर्माण होणे हे योग्य नाही. मात्र ते तेवढ्यासाठीच भेटले का? हा प्रश्न आहे. सध्या महायुतीत बरीच गडबड सुरु आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत, असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी सातारा जिल्ह्यातील कराड येथे केला.

कराड येथील जेष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पुतळा अनावरण आणि कोयना बॅंकेच्या इमारत उद्घाटनासाठी आमदार बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) कारड आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, कॉग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, 'ज्येष्ठ नेते शरद पवार हे आदरणीय मार्गदर्शक व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या वयाबाबत जी चर्चा झाली ती संस्कृतीला शोभणारा नाही. ते मार्गदर्शकच आहेत हे नाकारता येणार नाही. वयाची चर्चा करणारे छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांची भेट नेमकी कशासाठी घेतली हे माहिती नाही. ते जातीय तेढ निर्माण होवू नये यासाठी भेटले असतील तर आनंदच आहे.'

तसेच 'जाती-जातीत तेढ निर्माण होणे हे योग्य नाही. मात्र ते तेवढ्यासाठीच भेटले का? हा प्रश्न आहे. सध्या महायुतीत बरीच गडबड सुरु आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत. जे-जे समाजधुरीण असतील त्यांनी जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र समाजा-समाजात तेढ निर्माण होणे योग्य नाही.' असंही थोरात म्हणाले.

काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटींग केले त्यांची अजित पवार(Ajit Pawar) आणि देवेद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली, या प्रश्नावर आमदार थोरात म्हणाले, 'काँग्रेसच्या आमदारांची दोन्ही नेत्यांबरोबर बैठक झाली हे सांगितले जात असले तरी ते आम्हाला माहिती नाही. आम्हाला क्रॉस व्होंटींगची निष्पत्ती आलेली आहे. त्याचा अहवाल आम्ही दिल्लीला पक्ष श्रेष्ठींकडे पाठवलेला आहे. त्यावर आता योग्य निर्णय योग्य वेळी होईल. भास्करराव जाधव विश्वजीत कदम यांचा क्रॉस व्होटींगमध्ये समावेश असल्याचे पाहिले असल्याचे म्हणत असतील तर तो त्यांचा विषय नाही. त्यांनी त्याबाबतीत बोलणे योग्य नाही.' असेही त्यांनी सुनावले.

लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद विधानसभेला मिळेल -

दैनिक सकाळने केलेल्या सर्व्हेत महाविकास आघाडीचे पारडे जड दाखवत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार थोरात म्हणाले, 'सरकार ज्या पध्दतीने बनले आहे ते लोकांना मान्य नाही. हे सरकार बनवण्यासाठी ज्या पध्दतीने नेते फोडण्यात आले, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, निरनिराळ्या पध्दतींचा वापर करण्यात आला, खोक्यापर्यंत चर्चा झाल्या हे जनतेला मान्य नाही. जनता हे विसरणार नाही. लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद यावेळी विधानसभेला महाविकास आघाडीला मिळेल.' अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT