Bhagirath Bhalke-Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke : पालकमंत्र्यांच्या प्रश्नाला भगीरथ भालकेंचे खणखणीत उत्तर : निधी देणारा माणूस इथं बसलाय, येऊन बघ...

Jaykumar Gore News : भगीरथ भालकेंनी जयकुमार गोरेंच्या निधीच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीतच जोरदार प्रत्युत्तर देत पंढरपूरच्या राजकारणात संघर्ष अधिक तीव्र केला आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 12 April : पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या काळात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत खणखणीत उत्तर दिले आहे. ‘भालकेजी, तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहात. माझ्याकडंच यावं लागणार आहे, असे ते सांगत होते. अरं निधी देणारा हा माणूस इथं आहे, इथं बघ येऊन, असे सांगून भगीरथ भालकेंनी गोरेंना चॅलेंज केले आहे.

पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके, भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, रोहयो मंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना भालके यांनी गोरे यांना चॅलेंज दिले आहे.

ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीच्या काळात सोलापूरचा पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) गणपती मंडळाच्या आरतीला फिरावं, तसं पंढरपूरच्या गल्लीबोळात फिरत होता. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर आणि नगरपालिकेत पाहिलंय, पालकमंत्री चौका-चौकात येऊन सांगत होता.

मला आणि माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, ‘भालकेजी तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहात. तुम्ही निवडून आल्यानंतर निधीसाठी माझ्याकडंच यावं लागणार आहे. मी त्या वेळी ठामपणं सांगितलं हेातं की आम्ही भारतनाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलो कार्यकर्ते आहोत. अरे निधी देणारा हा माणूस इथं आहे, बघ येऊन, असे चॅलेंज भालकेंनी गोरे यांना दिले आहे.

ते म्हणाले, निधी कुठून देणार आहे, हा जो अविर्भाव आहे. गर्वाचा जो उन्माद आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत अशी वागणूक दिली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री असताना निधी देताना एकनाथ शिंदे यांनी कधीही भेदभाव केला नाही. आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आपल्यासोबत राहू, असा शब्द देतो.

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही, ‘जा लढ, तुझ्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा आहे,’ असा शब्द दिला. त्यानंतर सहकाऱ्यांना नगरपालिका निवडणूक सक्षमपणे लढायची आहे, असे बजावले होते, असेही भालकेंनी नमूद केले.

रणांगणातून पळणारा नव्हे; तर पळवून लावणारा मी आहे

ते म्हणाले, डोक्यावर कुणाचाही हात नसताना मी २०२४ च्या निवडणुकीत १ लाख १६ हजार मतं मिळाली होती. पण निसटत्या मतांनी पराभव झाला. पण रणांगणातून न पळता रणांगणातून पळवून लावण्याचे काम करायचं असतं, त्याप्रमाणं सध्या काम करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT