Eknath Shinde Operation Tiger; Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bharat Gogawale : ठाकरेंना पुन्हा हादरा? 'ऑपरेशन टायगर' बाबत शिंदेंच्या बड्या नेत्याचे संकेत; 'आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल'

Bharat Gogawale Hints At New Operation Tiger : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’बाबत केलेल्या सूचक विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे.

Aslam Shanedivan

Shivsena Operation Tiger News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने घेतलेल्या शिवसेना मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन होणार आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल, असे म्हटलं आहे. तर गोगावले यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे संकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी नुकतेच दिले होते. तर शिवसेनेतील एकदेखील आमदार फुटणार नाही, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदारांनी व्यक्त केला होता.

मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी, “थोडा वेळ थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार शिंदेंकडे येतील. शिंदे बोलत नाहीत, ते फक्त आपल्या दाढीवरून हात फिरवतात, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं असेल,” असा सूचक इशारा त्यांनी दिला होता.

ज्या दिवशी हे ऑपरेशन होईल, त्या दिवशी ती सर्वांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज असेल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरबद्दल थेट न बोलता संकेत दिले होते. सध्या या वक्तव्यांची राज्यात चर्चा सुरू असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने सांगोल्यात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोगावले यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेनेच्या आगामी रणनीतीचा उल्लेख करताना, राज्यात लवकरच आणखी एक मोठे राजकीय ‘ऑपरेशन’ होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात. ते कुणाला कळत नाही. लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन होणार आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल. पण, हे ऑपरेशन नेमके कोणत्या पक्षाशी किंवा कोणत्या नेत्यांशी संबंधित आहे, याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत. पण त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे आणखी १४ आमदार फुटणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT