Operation Tiger: नाशिक महापालिकेत ऑपरेशन टायगर चर्चेत; दुसऱ्याच दिवशी आंदोलनाला ठाकरेंच्या नगरसेवकांची दांडी काय सांगून जाते?

Nashik Shiv Sena Uddhav Thackeray leader Ravindra Mirlekar Operation Tiger real or fictional-उद्धव ठाकरेंच्या संपर्क नेत्याच्या कार्यक्रमालाच नगरसेवकांची दांडी, रवींद्र मिर्लेकर यांची पंचाईत
Uddhav-Thackerey-Eknath-shinde
Uddhav-Thackerey-Eknath-shinde Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: दोन दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेत १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात या बातमीने खळबळ उडाली. त्यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही पक्षांनी त्याचे खंडन आणि समर्थन केले. 

शिवसेना एकनाथ शिंदे हा पक्ष आणि नेते सध्या उद्धव ठाकरे पक्षात फूट पाडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे. यासाठी राज्यातील सत्तेचा पुरेपूर उपयोग केला जात आहे. फोडाफोडीचे हे लोन आता नाशिक महापालिकेतही पोहोचले. 

नाशिक महापालिकेचे १२ नगरसेवक शिवसेना शिंदे पक्षाचा संपर्क असल्याचे चर्चा आहे. त्यावर उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. नगरसेवक फोडण्यासाठी एजंट नेमल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना शिंदे पक्षाकडून उपनेते अजय बोरस्ते यांनी त्याचा समाचार घेतला होता.

Uddhav-Thackerey-Eknath-shinde
Nashik Politics: नाशिक महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’ ऑन? ठाकरेंचे १२ नगरसेवक शिवसेनेत जाण्याची चर्चा: प्रत्येकी २ कोटी विकासनिधीचे आमिष

नाशिक शहरात ऑपरेशन टायगर विषयी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या काळाराम मंदिरात झालेल्या रामरक्षा आंदोलनात वेगळाच संदेश मिळाला. या कार्यक्रमाला ठाकरेंच्या बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवली. 

Uddhav-Thackerey-Eknath-shinde
Nashik: एकनाथ शिंदेंनी एजंट नेमले? ठाकरेंचे नगसेवक फोडण्यासाठी 5 कोटींचा निधी? नाशिकमध्ये दोन कट्टर शिवसैनिक भिडले

संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली राम रक्षा आंदोलन झाले. महापालिकेतील पंधरापैकी महानगर प्रमुख प्रथमेश गीते, सीमा पवार, माधुरी ढेमसे, वैशाली दळवी हे मोजके नगरसेवक यावेळी उपस्थित होते. त्यामुळे मी लेखन यांना त्याचे उत्तर देताना चांगलीच कसरत करावी लागली.

गेल्या महिन्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर आमदार आणि मुंबई महापालिकेचे नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे सावध झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि पक्षनेत्यांच्या बैठकांचा धडाका लावला होता. आता नाशिक महापालिकेतही हे लोन पोहोचले की काय? असा संशय कल्लोळ निर्माण झाला आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com