Operation Tiger : नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? 'ऑपरेशन टायगर'ची 3 मंत्र्यांवर जबाबदारी, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ?

Uddhav Thackeray MLAs joining Shinde Sena : ऑपरेशन टायगर अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्या काही आमदारांची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागणार असून, याबाबतची पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.
14 MLAs join Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Operation TigerSarkarnama
Published on
Updated on

Operation Tiger Shinde Shiv Sena: आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप आणणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कारण नवरात्रीपूर्वी ठाकरेंचे १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या १४ आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर देण्यात आली आहे. यापैकी ६ आमदारांना सरकारमधली चांगली खाती आणि मंत्रीपदे पाहिजेत, अशीही माहिती समोर आली आहे.

तर यापैकी काही आमदारांची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागणार असून, याबाबतची पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. तर नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्षप्रवेश झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंकडून आणखी एक सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

14 MLAs join Eknath Shinde Shiv Sena
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांसाठी शरद पवारांच्या खासदाराने धाडलं फडणवीसांना पत्र; म्हणाले, "मनोजदादांची प्रकृती अन् मराठा समाजाच्या भावना..."

त्यामुळे नुकतंच एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरेंचे ६ खासदार फोडून त्यांना मोठा धक्का दिला होता. यानंतर आता लगेचच शिंदे ठाकरेंचे तब्बल १४ आमदार फोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

14 MLAs join Eknath Shinde Shiv Sena
India GDP Growth : GDP चे अच्छे दिन येताच पंतप्रधान मोदी भलतेच खूश; नवे रील करत परदेशी प्रवास अन् सोनं खरेदीबाबत केलं मोठं वक्तव्य

शिवाय येत्या नवरात्रीपूर्वी हे ‘ऑपरेशन टायगर’ राबवलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे नवरात्रीपूर्वी या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यास ठाकरेंना आणखी एक आणि सर्वात मोठा धक्का बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com