P. N. Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

P. N. Patil : विधानसभेच्या बेरजेवरच ठरणार 'भोगावती'चा अध्यक्ष; 'या' नावांची चर्चा, उद्या उघडणार बंद लखोटा!

Rahul Gadkar

Kolhapur Political News : करवीर विधानसभेचे भवितव्य ठरवणाऱ्या भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील गटाने विरोधी आघाड्यांचा सुपडासाफ करत एकहाती सत्ता स्थापन केली. आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोरच ठेवून आमदार पी. एन. पाटील मतदारसंघातीलच प्रमुखाला कारखान्याच्या अध्यक्षपदावर बसवतील, अशी शक्यता आहे. याबाबत गुरुवारी बैठक होणार असून, शुक्रवारी बंद लखोटा उघडून अध्यक्षपदाचे नाव जाहीर होणार आहे.

'भोगावती'च्या निवडणुकीत पी. एन. पाटील (P. N. Patil) गटाचे सेनापती उदयसिंह कौलवकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अध्यक्षपदासाठी अनेक चेहरे समोर आले आहेत, पण आमदार पी. एन. पाटील यांचे कट्टर समर्थक बी. ए. पाटील व धीरज डोंगळे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी शुक्रवारी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कोल्हापूरला आहे.

कारखान्यावरील कर्ज आणि भविष्यातील अडचणी पाहता डोंगळेंना अध्यक्षपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे, तर उपाध्यक्षपदासाठी 35 वर्षांनी हात मिळवणी केलेल्या शेकापचे अक्षय पवार यांचा विचार होऊ शकतो. जर बी. ए. पाटील यांना अध्यक्ष केले, तर डोंगळे यांचा उपाध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो, अशीही चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, नूतन संचालक मंडळाची शुक्रवारी सभा होत आहे. त्या पाश्वभूमीवर गुरुवारी दुपारी नेत्यांची कोल्हापुरात बैठक होणार आहे. यामध्ये संचालकांची मते आजमावून घेतली जाणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी सकाळीच बंद लखोट्यातून नावे देण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच करवीरच्या क्षेत्रातील संचालकाला कारखान्याच्या अध्यक्षपदावर बसवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

भोगावतीवर पीएनच भारी

भोगावती कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार संपतराव पवार व गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीने २५ पैकी २४ जागा जिंकत सत्ता कायम राखली. विरोधी संस्थापक आघाडीचे धैर्यशील पाटील कौलवकर यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांचा पराभव केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT