Satara, 20 June : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून देशाच्या राजधानीतून एका मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. साताऱ्यातील वडूज पोलिसाच्या पथकाने दिल्लीत जाऊन ही कारवाई केली आहे. हा मांत्रिक संबंधित महिलेला मार्गदर्शन करत होता, अशी थेट कबुलीही संबंधित मांत्रिकाने दिली आहे, त्यामुळे या खंडणी प्रकरणात आणखी किती नावे पुढे येतात, याची उत्सुकता वाढली आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना खंडणी मागितल्याच्या आरोप प्रकरणी संबंधित महिला, शिवसेनेच्या (शिंदे गट) अनिल सुभेदार आणि तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. पत्रकार खरात यांना जामीन मिळाला आहे. मात्र या खंडणी प्रकरणात आता दिल्लीतील एका मांत्रिकाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.
वडूज पोलिसांनी दिल्लीतील (Delhi) अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला अटक केली आहे. हा मांत्रिक दिल्लीत लक्ष्मीनगर परिसरात राहायला होता आणि तोच खंडणी मागणाऱ्या संबंधित महिलेला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता, असेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
खंडणी मागणाऱ्या महिलेला याच मांत्रिकाने मार्गदर्शन केले होते आणि त्याच्या सांगण्यावरूनच तिने मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागितली होती, अशी थेट कबुलीच या मांत्रिकाने पोलिसांना दिली आहे.
दिल्लीतील एक मांत्रिक संबंधित महिलेला मदत करीत असल्याची माहिती वडूज पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीवरून वडूज पोलिसांच्या एका पथकाने दिल्लीत धाव घातली होती. अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला मथुरेजवळून पोलिसांनी सापळी रचून मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे.
संबंधित महिलेने आपल्या सांगण्यावरूनच मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असे अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाने सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे एक कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणातील काही हिस्सा मांत्रिकाला देण्याचे ठरले होते, अशी माहितीही पोलिस तपासातून पुढे आले आहे.
दरम्यान, दिल्लीतून एका मंत्रिकाला अटक केल्यानंतर जयकुमार गोरे खंडणी प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आणखी काही धागेदोरे हाती लागतात काय, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.