Malegaon Sugar Factory : बारामतीत PDCC बॅंक रात्री अकरापर्यंत उघडी; शरद पवारांचे थेट बॅंकेच्या नेतृत्वाकडे बोट...(Video)

Sharad Pawar Statement : रात्री दोन आणि बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते, याचा अर्थ काय समजायचा तो समजून घ्या.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 20 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी सध्या जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून ते बारामतीत तळ ठोकून आहेत. याच निवडणुकीच्या दरम्यान दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची बारामतीच्या आमराई भागातील शाखा रात्री अकरापर्यंत सुरू होती, असा आरोप विरोधी गटाचे नेते रंजन तावरे यांनी केला आहे. त्याबाबत खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सडेतोड भाष्य करताना ‘बॅंकेचे नेतृत्व करणाऱ्यांच्या सूचनेशिवाय कर्मचारी कशाला बॅंक उघडतील’ असा सवाल करत बॅंकेचे नेतृत्व करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी (Malegaon Sugar Factory) येत्या रविवारी (ता. 22 जून) मतदान होत आहे. तत्पूर्वी आरोप-प्रत्यारोपांची मोठी राळ उटली आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बॅंकेची शाखा रात्री अकरापर्यंत सुरू होती. त्या ठिकाणी काही खासगी लोक होते, बॅंकेची संगणक प्रणाली सुरू होती. तसेच, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या होत्या, असा आरोप विरोधी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे यांनी केला होता. तसेच त्यांनी आचारसंहिता भंग झाल्याची तक्रारही केली आहे.

पीडीसीसी बॅंकेच्या (PDCC Bank) शाखेत रात्री बारा वाजता खासगी व्यक्ती कशासाठी आल्या होत्या. तेथील टेबलावर माळेगाव सहकारी साखर काखान्याच्या यादा कशाला ठेवण्यात आल्या होत्या, असा सवाल करून तावरे यांनी याबाबत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही रंजन तावरे यांनी केली आहे.

रंजन तावरे यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या रात्री उशिरापर्यंत चालू राहण्याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पीडीसीसी बॅंक रात्री बारा की दोनपर्यंत उघउलेली होती. त्यामुळे हा प्रकार पीडीसीसी बॅंकेबाबत दुसऱ्यांदा घडत आहे.

Sharad Pawar
Bala Nandgaonkar : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत मनसेकडून प्रथमच भाष्य; नांदगावकर म्हणाले, ‘राजसाहेबांच्या मनात... ’

बॅंक रात्री बारापर्यंत कशी उघडी? बॅंकेचे नेतृत्व करणारे जे लोकं आहेत. त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी बॅंक कशाला उघडेल. रात्री दोन आणि बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते, याचा अर्थ काय समजायचा तो समजून घ्या, असे सूचक विधानही शरद पवार यांनी केले आहे.

ते तुम्ही अजित पवारांनाच विचारा

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उमेदवार आहेत. तसेच माळेगावचा चेअरमन पाच वर्षे मीच राहणार, असेही जाहीर केले आहे. आता मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे, त्यामुळे अजित पवार हे बारामतीत तळ ठोकून आहेत. त्याबाबत बोलताना शरद पवारांनी ‘हा प्रश्न तुम्ही अजित पवारांनाच विचारा,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar
Baliram Sathe : पवारांनी शब्द देताच बळीराम साठे यांचे बंड थंडावले; म्हणाले, आगामी काळातही साठे माझ्यासोबतच असतील’

लोकसभा निवडणुकीतही वेल्ह्यात बॅंक पहाटेपर्यंत उघडी होती...

लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पुणे जिल्हा सहकारी बॅंकेची वेल्हे तालुक्यातील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू होती, त्याबाबत आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत आरोप केला होता. त्या प्रकरणी निवडणूक आयोगाने शाखाधिकारी विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com