Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patole on Pawar Family : भाजपनं पवारांच्या घरात भांडण लावलं; नाना पटोलेंचा आरोप

Solapur Loksabha election 2024 : आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं की, भाजप तुम्हाला चक्रव्यूहमध्ये टाकेल आणि त्यांचेच लोक आता बोलायला लागले आहेत. पहिल्यांदा मी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 April : भाजपने पवारांच्या कुटुंबात भांडण लावलं आहे. पवाराचं घर भाजपने तोडलं आहे. पवारांनी एकत्र राहावं, असा आमचा विचार आहे. त्यांना काय वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे. भाजप अशी घर फोडून महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते बरोबर नाही. अनेक कुटुंबांना ते समजलं पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आज (ता. 18 एप्रिल) शक्तिप्रदर्शन करत आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. त्या सभेत प्रदेशाध्यक्ष पटोले (Nana Patole) बोलत होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे, त्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं होत की, भाजप तुम्हाला चक्रव्यूहमध्ये टाकेल आणि त्यांचेच लोक आता बोलायला लागले आहेत. पहिल्यांदा मी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना सल्ला दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. राजकारण करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आपलं काम केलं पाहिजे, असं विधान आमदार नाना पटोले यांनी केले.

रेमडेसिव्हर औषधाचा जो काळाबाजार करत होता, त्या व्यक्तीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रात्री पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबावू टाकून त्यांना वाचवले होते, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

ते म्हणाले, अजित पवार वाशिंग मशीनमधून बाहेर आलेले आहेत. अजित पवारांना अमित शाह, मोदी यांना खूष ठेवायचं आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर मोदी आणि शाह माझ्यावर खूष राहतील, असं अजित पवार यांना वाटत असेल. तो विषय त्यांनी डोक्यातून काढला पाहिजे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT