Solapur Lok Sabha : माजी खासदारांना सोबत घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का?; प्रणिती शिंदेंचा बोचरा सवाल

Lok Sabha Election 2024 : ही लोकसभेची निवडणूक माझी असली तरी ही सर्वांची लढाई आहे. या लढाईत तुमची साथ मला हवी आहे. आपल्याला सोलापूरचा चेहरामोहरा बदलायचा आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 April : लोकसभेची ही निवडणूक माझी असली तरी ही सर्वांची लढाई आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत लढा. मला तुमची साथ हवी आहे. गेल्या दहा वर्षांत सोलापुरात भाजपने काहीच केले नाही, त्यामुळेच भाजप मुद्द्यावर बोलत नाही. दोन्ही माजी खासदारांना सोबत घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का? असा सवाल सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी (Solapur Lok Sabha Constituency) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आज (ता. १८ एप्रिल) शक्तिप्रदर्शन करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी माजी खासदारांवर निष्क्रीयतेचा आरोप केला. तसेच, आशीर्वाद देण्यासाठी आणि रॅलीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शिंदे यांनी आभार मानले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde
Raj Thackrey News : राज ठाकरेंनी महायुतीसाठी उतरवले 38 शिलेदार मैदानात...

त्या म्हणाल्या, ही लोकभेची निवडणूक माझी असली तरी ही सर्वांची लढाई आहे. या लढाईत तुमची साथ मला हवी आहे. आपल्याला सोलापूरचा (Solapur) चेहरामोहरा बदलायचा आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा. गेल्या दहा वर्षांत सोलापुरात भाजपने काहीच केले नाही, त्यामुळे भाजप मुद्द्यांवर बोलत नाही.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. सोलापुरात पाणी नाही, त्यामुळे भाजपच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. माझ्याशी विषयांतर करू नका. ही माझी लढाई आहे, पण या लढाईत तुम्ही माझ्यासोबतच लढा. दोन्ही माजी खासदारांना सोबत घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

Praniti Shinde
Praniti Shinde News : शक्तिप्रदर्शन करत प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आमदार शिंदे म्हणाल्या, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे आमच्या खांद्याला खांदा लावून सोलापूरची सेवा करत आहेत. शिंदे कुटुंबीयांना लोकांमधून ऊर्जा मिळते, ते आमचे केंद्रबिंदू आहेत. लोकांना आम्ही देव मानतो आणि त्यांची सेवा अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू. भाजपने गेल्या दोन वर्षांत उजनीच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही.

सोलापुरातील असंघटित कामगारांसाठी डॉ. मनमोहन सरकारच्या काळात 30, 000 घरे बांधण्यात आली आहेत. त्याबद्दल माजी आमदार आडम मास्तर यांनी भाजपला त्यांच्या शब्दांत उत्तर दिले आहे. नाना पटोले भावाच्या रूपाने आशीर्वाद देण्यासाठी माझा उमेदवारी अर्ज भरायला आले आहेत .

R

Praniti Shinde
Solapur Lok Sabha 2024 : पंढरपूर-मंगळवेढ्यातील बड्या नेत्याचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com