Dhairyasheel mohite patil-Ranjitshinh Naik Nimbalkar-Ram Satpute-Praniti shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : सोलापुरात निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर; सातपुतेंचा सर्वाधिक 84 लाख, मोहिते पाटलांचा सर्वांत कमी 51 लाख

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 May : जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात भारतीय जतना पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढाई पहायला मिळाली. या दोन्ही मतदारसंघात भाजपकडून हात सैल सोडण्यात आल्याचे खर्चाच्या आकडेवारीरून दिसून येते. विशेषतः सोलापूर आणि माढ्यात भाजपचे दोन्ही उमेदवार हे महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा खर्चात पुढे आहेत. या चार मुख्य उमेदवारांमध्ये सोलापूरचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सर्वाधिक 84 लाख रुपये खर्च केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सर्वांत कमी 51लाख रुपये खर्च माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा झाला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Loksabh Constituency ) काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांची उमेदवारी दोन महिने आधीच जाहीर झाली होती. त्यांच्या विरोधात आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना अखेरच्या क्षणी भाजपकडून उतरविण्यात आले. सातपुते यांच्या तुलनेत तयारीसाठी प्रणिती शिंदे यांना अधिकचा वेळ मिळाला होता. गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचा डाग पुसून काढण्याठी शिंदे बाप लेक मोठ्या तयारीनीशी मैदानात उतरले होते. त्यानुसार त्यांनी भाजपचा उमेदवार घोषित होण्यापूर्वीच प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या हेात्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याच्या उलट माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून झाले होते. माढ्यात पहिल्याच यादीत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांची उमेदवारी जाहीर झाली होती. भाजपने तिकिटात डावलल्याने मोहिते पाटील यांनी बंड करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या.

दरम्यान, खर्चातही भाजपचे दोन्ही उमेदवार पुढे आहेत. सोलापूरचे भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांचा खर्च सर्वाधिक म्हणजे 81 लाख रुपये झाला आहे. त्यानंतर काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचाही खर्च 74लाख रुपये झालेला आहे. सोलापूरच्या तुलनेत माढ्यातील दोन्ही उमेदवारांचा निवडणूक खर्च अत्यंत कमी आहे. भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीत 62 लाख रुपये, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा 51लाख रुपये खर्च झाला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतमोजणीपर्यंतचा खर्च निवडणूक खर्चात धरला जातो. मतमोजणी दिवशी आणलेल्या गाड्यांचाही खर्च निवडणूक खर्चात धरला जातो. लोकसभेच्या उमेदवाराला 91 लाखांपर्यंत खर्च करण्याची परवानगी आहे. त्या पेक्षा जादा खर्च झाल्यास निवडून आलेल्या उमेदवाराला अपात्र करण्याची तरतूद केलेली आहे.

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा सादर झालेला खर्च हा अंतिम नाही. या खर्चात वाढ अथवा कपात होऊ शकते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचा खर्च अंतिम करण्याची 29 जूनपर्यंत मुदत आहे. तत्पूर्वी निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा निवडणूक खर्च पडताळणी समिती यांची बैठक होऊन उमेदवारांच्या खर्चात आकडे अंतिम केले जातील, असे सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT