Kolhe-Adhalrao's Victory Flex : निकालाआधीच आढळराव-कोल्हेंच्या विजयाचे फ्लेक्स झळकले!

Shirur Lok Sabha Constituency : प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शिरूर मतदारसंघाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यामुळे शिरूरमध्ये आढळराव पाटील जिंकणार की डॉ. कोल्हे पुन्हा बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

Amol Kolhe-shivajirao Adhalrao Patil
Amol Kolhe-shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची निवडणूक झाली. गेल्यावेळी २०१९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे यावेळी राष्ट्रवादीकडून, तर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले डॉ. अमोल कोल्हे हे या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात होते. दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाली आहे. मात्र, निकालाआधीच दोन्ही नेत्यांच्या उत्साही समर्थकांकडून कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्या विजयाचे फलक लावण्यात आले आहेत.

शिरूरमध्ये (Shirur ) आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या पाठीशी कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी यंत्रणा होती, मतदानाच्या दिवशी मतदान करून घेण्यासाठी ही यंत्रणा जोमाने कामाला लागली होती. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूने अत्यंत जोमाने आणि चुरशीने ही निवडणूक लढवली गेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)


Amol Kolhe-shivajirao Adhalrao Patil
Governor in Mahabaleshwar : राज्यपाल बैस आजपासून महाबळेश्वर मुक्कामी; लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

अमोल कोल्हे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी, तर महायुतीकडून आढळराव यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांनी सभांचा फड गाजवला. शिरूरमध्ये १३ मे रोजी मतदान झाले असून येत्या चार जूनला मतमोजणी होणार आहे.

प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शिरूर मतदारसंघाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यामुळे शिरूरमध्ये आढळराव पाटील जिंकणार की डॉ. कोल्हे पुन्हा बाजी मारणार, याची उत्सुकता आहे. मतमोजणी चार जूनला असली तरी त्या अगोदरच दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. निकालासंदर्भात काही ठिकाणी पैजाही लागल्या आहेत.

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे आढळराव पाटील यांचा विजयाचा फ्लेक्स लावला आहे, तर पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे पिंपरी-चिंचवड शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फ्लेक्स झकळले आहेत. त्यामुळे शिरूरमधून नक्की कोण बाजी मारणार, याची उत्सुकता कमालीची वाढली आहे.


Amol Kolhe-shivajirao Adhalrao Patil
Lok Sabha Election 2024: दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार? भाजप-काँग्रेसची दमछाक!

दरम्यान, मतदानाच्या दुसऱ्या दिवसापासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रीय झाले आहेत. आढळराव हे गेली पाच वर्षांपासून जनतेच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे जनता दरबार भरवत आहेत. त्यांनी गेली रविवारपासून (ता.19 मे) नियमितपणे तो सुरू केला आहे. खासदार अमोल कोल्हे हे स्टार प्रचारक असल्याने ते मतदानानंतर लगेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई, नाशिक, दिंडोरी, धुळे, वणी या ठिकाणी सभा घेतल्या. तसेच, जुन्नर तालुक्यातील आळे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.

गद्दारी जनतेला पटलेली नाही : निकम

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली गद्दारी महाराष्ट्रातील जनतेला पटलेली नाही. त्यामुळे त्यांनी गद्दारांना निवडणुकीत चांगलाच धडा दिला आहे, त्यामुळे शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय निश्चित आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी सांगितले.


Amol Kolhe-shivajirao Adhalrao Patil
Bhujbal Vote to Shivsena : बाळासाहेबांना चॅलेंज करणाऱ्या भुजबळांनी 34 वर्षांनंतर उमटवली धनुष्यबाणावर मोहोर...!

विकास निधी, कार्यकर्त्यांच्या संचामुळे आढळरावांचा विजय निश्चित

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे यांनी विकास कामांसाठी मतदारसंघात दिलेला निधी, आढळराव पाटील यांचा गेली 20 वर्षांपासून मतदारसंघात असलेला संपर्क, तसेच महायुतीचे मतदारसंघातील पाच आमदार व सहाही तालुक्यांत महायुतीचे कार्यकर्ते आणि घटक पक्षाने केलेले काम यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूरमधून विजय निश्चित आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे यांनी स्पष्ट केले.


Amol Kolhe-shivajirao Adhalrao Patil
Karnataka Legislative Council Election : लोकसभेच्या रणधुमाळीतच कर्नाटकात वाजले विधानपरिषदेचे बिगुल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com