Mahesh Kothe- Vijaykumar Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vijaykumar Deshmukh : विजयकुमारांनी उधळले महेश कोठेंचे स्वप्न; पाचव्यांदा गुलाल उधळत देशमुखच ठरले सोलापूर शहर उत्तरचे 'मालक'

Solapur City North constituency Final Result : सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्यावर 54 हजार 247 मतांनी विजय मिळविला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur City North constituency Vishleshan : सोलापूर शहर उत्तर मतदारासंघाच्या लढतीत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पुन्हा एकदा आपले सर्व राजकीय कसब पणाला लावत जागा राखण्यात यश मिळवले आहे. देशमुख यांच्या विजयामुळे माजी महापौर महेश कोठे यांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीमुळे कोठे यांच्या विजयाची वाढलेली उत्सुकता बनशेट्टी यांना अपेक्षित मते न मिळवता आल्यामुळे अपेक्षाभंग झाला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्यावर ५४ हजार २४७ मतांनी विजय मिळविला आहे. या विजयामुळे देशमुख हे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलगर पाचव्यांदा विजयी झाले आहेत.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

सोलापूर शहर उत्तर मतदार संघात 2009 नंतर प्रथमच महेश कोठे आणि विजयकुमार देशमुख हे आमने सामने आले होते. त्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी कोठे यांनी सर्व तयारी पूर्ण केली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यभरात क्रेझ असलेल्या तुतारीची साथी मिळाली होती. मात्र, देशमुख यांची वोट बॅंक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची मदत या निवडणुकीत निर्णायक ठरली असून त्याचा फायदा देशमुख यांना झाल्याचे दिसून येत आहे.

खरंतर लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यात तुतारीसाठी अनुकूल वातावरण होते. महेश कोठे यांनीही मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती. मात्र, देशमुख यांच्या मताला कोठे हे हात लावू शकले नाहीत, त्यामुळे देशमुख यांनी पुन्हा एकदा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे आपणच मालक असल्याचे सिद्ध केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता. तसेच, माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाचा राजीनामा देत बंडखोरी केली, त्यामुळे देशमुख यांची चिंता वाढली होती. मात्र, देशमुख हे नेहमीप्रमाणे शांत राहून आपल्या चाली चालत होते. आतापर्यंत त्यांनी मतदारसंघात उभे केलेले समर्थक आणि भाजपच्या नेत्यांना कामाला लावत विधानसभेत पाचव्यांदा सरशी साधली आहे.

खरं तर विजयकुमार देशमुख यांच्याबाबत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बाजारपेठेतील व्यापारीही त्यांच्यावर नाराज होते. मात्र, या सर्वांची समजूत काढण्यात देशमुख यांनी यश आले असून त्याचे परिणाम मतदानातून दिसून आले आहेत.

महेश कोठे यांनी सुरुवातीपासूनच प्रभावी प्रचारयंत्रणा राबवली होती. या मतदारसंघातील त्यांच्या संस्था हा घटक त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे वाटत होते. मात्र त्या त्यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकलेल्या नाहीत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्यावर 54 हजार 247 मतांनी विजय मिळविला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT