Madha Election Vishleshan : माढ्यातील 30 वर्षांच्या शिंदेशाहीला पवारांच्या पठ्ठ्याने लावला सुरुंग

Madha Assembly Election 2024 Result : विशेषतः माढा तालुक्यातील 74 गावांतही अभिजीत पाटील यांनी मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. या 74 गावांमध्ये अभिजीत पाटील यांनी रणजीत शिंदे यांना तोडीस तोड टक्कर दिल्याचे दिसून येत आहे.
Abhijeet Patil-Babanrao Shinde-RanjitS hinde
Abhijeet Patil-Babanrao Shinde-RanjitS hindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 November : राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या माढा मतदारसंघात लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करत बलाढ्य शिंदे कुटुंबाला पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील हे 30 हजार 621 मतांनी विजयी झाले आहेत. अभिजीत पाटील यांनी 1 लाख 36 हजार 559 मते मिळाली असून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार रणजितसिंह बबनराव शिंदे यांना 1 लाख 05 हजार 938 मते मिळाली आहे. त्यामुळे अभिजीत पाटील यांनी माढ्यातील शिंदेशाही तब्बल तीस वर्षांनंतर संपुष्टात आणली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेचा मोठा परिणाम शेवटच्या क्षणी झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः माढा तालुक्यातील 74 गावांतही अभिजीत पाटील यांनी मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. या 74 गावांमध्ये अभिजीत पाटील यांनी रणजीत शिंदे यांना तोडीस तोड टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. पाटील यांच्या या विजयामुळे माढा तालुक्यातील शिंदे कुटुंबीयांची सद्दी संपुष्टात आणली आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

आमदार बबनदादा शिंदे यांना शरद पवार यांची साथ सोडणे महागात पडल्याचे या पराभवातून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करूनही मोहिते पाटील यांच्या विरोधामुळे बबनदादा आपल्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून देऊ शकले नाहीत. आमदार शिंदे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. अगदी विरोधकांच्या घरी जाऊन त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत दिसलेले तुतारीची झलक पुन्हा एकदा माढ्यात दिसून आली आहे.

माढ्यात बबनराव शिंदे यांना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर होती. मात्र, भाजपला असलेला मराठा समाजाचा विरुद्ध लक्षात घेऊन बबनदादा शिंदे यांनी मुलाला अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा तो डाव यशस्वी होऊ शकला नाही.

Abhijeet Patil-Babanrao Shinde-RanjitS hinde
Abhijeet Patil Won : बबनदादांचे स्वप्न भंगले; माढ्यात अभिजीत पाटलांकडून रणजित शिंदेंचा दणदणीत पराभव

शरद पवार यांनी मात्र मोहिते पाटील यांच्या मदतीने उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत सर्व प्रचाराची यंत्रणा सावधपणे राबवली. त्यातच अभिजीत पाटील यांनी गेली पाच सहा महिन्यांपासून सुरू केलेली तयारीही महत्वपूर्ण ठरली आहे. पवारांची टेंभुर्णी येथे झालेली सभा निर्णायक ठरली असून त्या सभेचा इम्पॅक्ट मतदानात दिसून आला.

अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून बबनराव शिंदे यांना प्रथमच कडवे आव्हान मिळाले होते. याशिवाय गेल्या सहा टर्माची अँटी इन्कमबन्सीही अभिजीत पाटील यांच्या पथ्यावर पडली. बबनराव शिंदे यांच्याबरोबर तालुक्यातील काही महत्वपूर्ण नेते होते. मात्र, जनता आणि कार्यकर्ते हे अभिजीत पाटील यांच्यासोबत असल्याचे दिसून आले.

अभिजीत पाटील यांनी प्रचारात गेल्या 30 वर्षांत विकास झाला नसल्याची भूमिका सातत्याने मांडली, तो मुद्दा महत्वपूर्ण ठरला. याशिवाय उसदराचा मुद्दाही या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला आहे. संपूर्ण प्रचारात बबनदादांना याच विषयावर स्पष्टीकरण द्यावे लागले. तसेच, बबनदादा यांची प्रतिमा चांगली असली तरी उमेदवार रणजितसिंह शिंदे यांच्यामुळे काही जवळचे नेतेही लांब गेल्याचा फटका या निवडणुकीत शिंदे यांना बसलेले दिसून येते.

Abhijeet Patil-Babanrao Shinde-RanjitS hinde
Dr. Babasaheb Deshmukh : ‘काय डोंगार, काय झाडी’फेम शहाजीबापूंना गणपतआबांच्या नातवाने केले चितपट...

मोहिते पाटलांची भूमिका निर्णायक

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हाती घेण्यास अडथळा ठरणाऱ्या शिंदे कुटुंबीयांचा अडसर दूर करण्याचा प्रयत्न मोहिते पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा झाला. तसेच, शिंदे विरोधकांना एकत्र ठेवण्यातही मोहिते पाटील यांना शेवटपर्यंत यश आले, त्याचा परिणाम निकालात दिसून आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com