Narendra Modi-Amit Shah-Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raut Attack Modi-Shah : भाजप ही राजकीय पार्टी नसून मोदी- शाह यांची टोळी; संजय राऊतांचा हल्लाबोल

Solapur Political News : राज्यात आता राजकारण राहिलं नाही. सुडाचं, बदला घेण्याचं आणि बदनामीचं राजकारण यापूर्वी राज्यानं कधीही पाहिलं नाही.

Vijaykumar Dudhale

Solapur News : भाजप ही ढोंगी पार्टी आहे. तो राजकीय पक्ष नसून टोळी आहे. त्यांना चालवू द्या. राजकीय पक्ष असे वर्तन कधी करतात का. वाजपेयी-अडवाणींच्या काळात भाजप हा विचाराधारा जोपासणारा पक्ष होता. आज तो नाही. आम्ही त्यांना राजकीय पक्ष मानत नाही. ही एक मोदी-शाह यांची टोळी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (BJP is not a political party but a gang of Modi-Shah: Sanjay Raut)

खासदार संजय राऊत हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप केला. त्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, आता हिंदू-मुस्लिम चालणार नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळे भाजपकडून जाती-जातींमध्ये भांडणं लावली जात आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधी पक्षातील लोकांवर छापे मारले जातात. पैसे फक्त विरोधी पक्षांकडे असल्याचे दिसून येते. पण, भाजप काय चिंचोक्यांवर निवडणूक लढवत आहे का. महाराष्ट्राची सामाजिक एकता उद्‌ध्वस्त करायची आणि निवडणुकीला सामोरे जायचे, अशी काहींची भूमिका आहे. मराठी म्हणून सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, अशी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. त्यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, अशी भूमिका मांडली होती. हा विषय महाराष्ट्रात संपणारा नाही. पण, भाजप आणि मोदी यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घातले पाहिजे.

राज्यात आता राजकारण राहिलं नाही. सुडाचं, बदला घेण्याचं आणि बदनामीचं राजकारण यापूर्वी राज्यानं कधीही पाहिलं नाही. अशा घाणरेड्या राजकारणाची दशकपूर्ती झाली आहे. रावणाची दहा तोंडे जशी उडविण्यात आली, तशी ती यांचीही सुद्धा तोंड उडवली जाणार आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले की, पुण्यात अलिकडील काळात सभा होत नाही. मोदीही पुण्यात सभा घ्यायला धजावत नाहीत. पण, पुण्यात शनिवारी शिवसेनेची मोठी सभा झाली. महाराष्ट्रातील जनतेचा कल, त्यांचा रोष या कालच्या सभेतून दिसून आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT