Sushilkumar Shinde-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushilkumar Shinde's Secret Blast : प्रणिती शिंदेंच्या प्रवेशासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केले; सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

विश्वभूषण लिमये

Solapur, 19 March : आमदार प्रणिती शिंदे यांना भारतीय जनता पक्षात घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. सोलापूरच्या जागेसाठी प्रणिती शिंदे यांना सोबत घेण्याचे भाजपचा प्लॅन होता. ते (भाजपवाले) प्रवेशासाठी येत होते. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग होतो आणि आहोत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सोलापूरमध्ये (Solapur) काही दिवसांपर्यंत होती. विभागीय नाट्यसंमेलनाच्या दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप प्रवेशाची आम्हाला ऑफर होती, असा गौप्यस्फोट केला होता. मात्र, ऑफर देणाऱ्या नेत्याचे नाव मी उघड करणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी आज प्रणिती शिंदे यांच्याबाबत भाष्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी त्यांनी (भाजपने) शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र प्रणितीने (Praniti shinde) विचार केला की मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. जी गांधी नेहरूंची काँग्रेस आहे, त्यामध्येच मी राहील, असा विचार तिने केला. काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत, मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील, असेही शिंदे यांनी नमूद केले.

शिंदे म्हणाले की, प्रणितीच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या मनात काय आहे, ते मी सांगू शकत नाही. पण ते भाजपवाले प्रवेशासाठी येतात. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत. प्रणितीदेखील स्ट्रॉंग आहे, तिला भाजपत जाणे हे पटत नाही. लोकांनी तिला तीन वेळेस निवडून दिले, त्यामुळे पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही.

राज ठाकरे- शाह यांच्या भेटीवर सुशीलकुमार शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, हा इलेक्शन प्रोसेसमधला निरनिराळ्या पार्टीचा चालणारा भाग आहे. त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही. प्रत्येकाची नीती असते, त्यामुळे भाजप शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करत राहणार आहेत.

मोहिते पाटलांना कोणतीही ऑफर नाही

मोहिते पाटील आमच्या पार्टीत नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलू. मोहिते पाटील यांना सध्या तरी आमच्याकडून कोणती ऑफर नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT