Solapur, 06 February : जिल्हा परिषद निवडणुकीला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना मोहोळ तालुक्यात जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या घरासमोर लिंबू-मिरची आणि त्यावर हळदी कुंकू टाकण्यात वाहिल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे चवरे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मोहोळ तालुक्यातील पेनूर गटातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे हे सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक (ZP Election) लढवत आहेत. त्यांच्या घरासमोर हा अघोरी प्रकार घडला आहे. मतदानाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना हा प्रकार घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेकडून (Shivsena) पेनूर गटातून चरणराज चवरे यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार रामदास चवरे अशी लढत होत आहे. तालुक्यातील एक तुल्यबळ लढत म्हणून या गटाकडे पाहिले जात आहे. चरणराज चवरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली आहे, त्यामुळे पेनूरमध्ये कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या (ता. ७ फेब्रुवारी) मतदान होत आहे, त्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आलेला आहे. चवरे हे पेनूरमध्ये राहतात. त्यांच्या राहत्या घरासमोर एका कापडावर लिंबू टाकून आमच्या फोटोवर सुई खोवण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यावर हळदी कुंकू टाकण्यात आले आहे, त्यामुळे हा जादूटोण्याचा प्रकार असल्याची एक चर्चा रंगली आहे.
याबाबत उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे म्हणाले, माझ्या घराच्या समोर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे. या प्रकारामुळे खरं तर मला आनंद होत आहे. कारण माझ्या सर्वसामान्य जनतेने आणि कार्यकर्त्यांनी त्यांना जादूटोण्यापर्यंत आणले आहे. अशा गोष्टींमुळे काही फरक पडणार नाही.
पेनूर जिल्हा परिद गटाची निवडणूक सर्वसामन्य जनतेने हातात घेतलेली आहे. एकनाथ शिंदे यांची सभा झाली आणि त्यानंतर तालुक्यातील सर्व सामन्या जनतेने दाखवून दिलं की, आम्ही चरणराज चवरे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. जादूटोण्यासारखे प्रकार करून काहीही उपयोग होत नसतो. त्या लिंबाचा सरबत करून पिण्याची ताकद माझ्यात आहे. अशा पद्धतीने चुकीचा प्रकार करून विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा इशारा चवरे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.