Shiv Sena deputy mayor : राजेंद्र जंजाळ यांच्या उपमहापौर पदावरून शिवसेनेत वाद; त्र्यंबक तुपेही मैदानात !

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज दाखल केलेला असताना माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनीही शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
Rajendra Janjal and sanjay shirsat
Rajendra Janjal and sanjay shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Mayor Election News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे महापौर, उपमहापौर पदाची नावे निश्चित झाली आहे. महापौरपदी अपेक्षेप्रमाणे भाजपचे समीर राजूकर तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची नावे निश्चित झाली आहेत. परंतु शिवसेनेत पुन्हा राजेंद्र जंजाळ यांच्या नावावरून वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज दाखल केलेला असताना माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनीही शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेत स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर पदासह उपमहापौर व सर्वच पदांवर भाजप (BJP) दावा सांगेल, असा अंदाज होता. कारण बहुमतासाठी भाजपला फक्त एका नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज होती. इतर पक्षाच्या काही नगरसेवकांनी पाठिंबा देऊ केला होता. परंतु राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेत असल्यामुळे भाजपने उपमहापौर पद शिवसेनेला देत सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला.

Rajendra Janjal and sanjay shirsat
Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली, बहुमत असूनही केला मोठा त्याग

उपमहापौर पदावर राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला. परंतु जिल्ह्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांना नडणाऱ्या जंजाळ यांच्या नावाला पक्षातील एका गटाचा आता विरोध सुरू झाला आहे. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी स्वतंत्रपणे उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले महापालिकेत हजर होते. तिथेच जंजाळ आणि त्यांची भेट झाली आणि 'कशाला रिकामे कामे करता' अशा शब्दात जंजाळ यांनी घोडेले यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

Rajendra Janjal and sanjay shirsat
Shivsena UBT : 'मोदींवर ट्रम्प यांचा प्रचंड दबाव, सर्व अटी-शर्ती मान्य; अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी भारताला गुलाम बनवले...'; ठाकरेंचा हल्लाबोल

यावर साहेब जे सांगतील तो निर्णय मान्य करू, असे सांगत घोडेले यांनी जंजाळ यांच्याशी अधिक बोलणे टाळले. महापालिका निवडणुकीच्या आधी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी यात लक्ष घालून दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. भाजपसोबतची युती तुटण्यालाही हा वादच कारणीभूत ठरला होता.

Rajendra Janjal and sanjay shirsat
NCP Internal Politics : 'अनसिक्युअर कोण?' नीलेश लंकेंच्या एका वाक्यानं राष्ट्रवादीत संशयाचं वादळ!

युती तुटल्याचा फटका शिवसेनेला (Shivsena) बसला आणि भाजपने स्वबळावर सर्वाधिक जागा जिंकत मोठा भाऊ होण्याचा मानही पटकावला. गेली वीस-पंचवीस वर्ष महापालिकेच्या राजकारणात फ्रंट सीटवर असलेल्या शिवसेनेला आता बॅकफुटवर जावे लागले आहे. 13 नगरसेवकच निवडून आल्याने भाजपनेही शेवटपर्यंत त्यांना सोबत घेण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव स्थानिक पातळीवर दिला नव्हता. आता शिवसेनेचा सत्तेतील सहभाग हा राज्यस्तरावरील नेत्यांच्या निर्णयातून झाला आहे.

Rajendra Janjal and sanjay shirsat
Congress Shiv Sena UBT Alliance : महापौर निवडणुकीआधी ट्विस्ट, स्वीकृतसाठी सस्पेन्स अन् एमआयएमविरोधात...

पालकमंत्री संजय शिरसाट यांना नडणाऱ्या राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौर पदावर वर्णी लागल्याने संजय शिरसाट याचा गट नाराज झाला आहे. या नाराजीतूनच त्र्यंबक तुपे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. अर्थात माघारीसाठी अवधी असला तरी या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी अद्याप सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. अर्थात याचाही फायदा भाजप महापालिकेतील पाच वर्षाच्या सत्तेत कायम घेत राहण्याची शक्यता अधिक आहे.

Rajendra Janjal and sanjay shirsat
Shivsena UBT : 'मोदींवर ट्रम्प यांचा प्रचंड दबाव, सर्व अटी-शर्ती मान्य; अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी भारताला गुलाम बनवले...'; ठाकरेंचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com