

Maharashtra local governance reform : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा माहोल असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता नगरपालिका व महापालिकाप्रमाणेच आता येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नेमणूक करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे मोठे विधान भाजपचे नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्याबाबत आवश्यक ते कायद्यात बदल करण्यात येतील, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महापालिकामधील स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवून आता दहा करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी गमावलेल्या नगरसेवकांना आता मागच्या दाराने पुन्हा सभागृहात दाखल होता येत आहे. त्यातच आता येत्या काळात जिल्हा परिषद (ZP Election) व पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नेमणूक करण्यासाठी दुरुस्ती विधयेक मांडण्याच्या हालचाली सुरु आहेत.
येत्या काळात जिल्हा परिषदेमधील दहा सदस्यामागे एक जण तर पंचायत समितीमधील पाच सदस्यांच्या पाठीमागे एक स्वीकृत सदस्य नेमणूक करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी लवकरच घटनादुरुस्ती केली जाणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाने याबाबतच्या नियमात दुरुस्ती करावी, अशी विनंती करण्यात आली असल्याचे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
राज्यात सध्या आरक्षणामुळे अनेकांची सदस्य होण्याची इच्छा असूनही संधी हुकते. त्यामुळे दुरुस्ती विधयेक येत्या काळात मांडण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पक्षीय बलाबलाप्रमाणे नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात याठिकाणच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे.
राज्यात एकीकडे 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. तर अद्याप राज्यातील जवळपास 20 जिल्हा परिषदेमधील ओबीसी आरक्षण वाढले असल्याने त्याबाबत कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी संधी मिळाली नाही, त्यांना आता मागच्या दाराने पुन्हा सदस्य होण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
येत्या काळात लवकरच जर जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी स्वीकृत सदस्य नेमणूक करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला तर राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्या आता वाढणार आहे. त्यामुळे भाजपने ऐन निवडणूक काळातच अशास्वरूपाची मागणी करीत नवा डाव टाकला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय नेत्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न: सतेज पाटील
राज्य सरकारच्या या कारभारावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टीका केली आहे. आता काय निर्णय घेतात निवडणूकीपूर्वीच अशाप्रकारचा निर्णय घेण्यास हवा होता. आता केवळ राजकीय नेत्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.