Satara Zilla Parishad controversy Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Update : सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचं गूढ वाढलं; पत्रातून ‘सीसीटीव्ही’बाबतचं वास्तव उघडकीस...

CCTV System Closed Satara: सातारा झेडपी राड्याप्रकरणी नवे खुलासे समोर येत असून शंभूराज देसाई धक्काबुक्की प्रकरणावर सत्य बाहेर येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 31 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. सातारा झेडपीतील अभूतपूर्व गोंधळाचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यासह विधीमंडळातही उमटले होते. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळीची मोठी घटना पुढे आली आहे, त्यामुळे सत्य समोर येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची २० मार्च रोजी निवड झाली. त्या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदान न करू देताच अटक करण्यात आली होती. त्यामुळे साताऱ्यात मोठा राडा झाला होता.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सातारा जिल्हा परिषद इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही यंत्रणा (CCTV) बंद असल्याचे पुढे आले आहे. एका पत्रातून ही गोष्ट पुढे आली आहे. सीसीटीव्हीचे वायर तुटले असल्याचाही उल्लेख त्या पत्रात करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यावेळी झालेल्या राड्याचे चित्रीकरण मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

सातारा जिल्हा परिषदेमधील सीसीटीव्ही यंत्रणेबाबतचे एकत्र पत्र पुढे आले आहे. त्यात जिल्हा परिषद इमारतीमध्ये पीओपीचे काम सुरू असल्यामुळे इथली सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचा उल्लेख त्या पत्रात करण्यात आलेला आहे. त्यामुळे २० मार्च रोजी झालेल्या राड्याचे व्हिडिओ चित्रीकरण मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.

सीसीटीव्ही फुटेज मागितलंय; पण आम्हाला अजून मिळालं नाही : देसाई

सातारा जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती, याची मला कोणतीही कल्पना नाही. तुम्ही सांगितल्यानंतर सीसीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचे तुम्ही सांगितल्यानंतरच मला कळाले आहे.

निवडणूक झाली, त्या २० तारखेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन सदस्यांनी जिल्हा परिषद आवरातील फुटेज आम्हाला मिळावं, असे एक पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या सभेचे प्रोसोडिंग मिळावं म्हणून दुसरे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, आम्हाला अजून मिळालेले नाही.

हे घडवायचं होतं; म्हणून पीओपीचं काम काढलं : वडेट्टीवार

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत घडवायचं होतं म्हणून पीओपीचं काम काढलं आणि पीओपीचं काम काढल्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली, ही वस्तुस्थिती आहे. पुरावे सापडू नयेत, म्हणून हे अगोदर केलं होतं, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT