Amit Thackeray Solapur Tour : सोलापुरात सरवदे कुटुंबाच्या भेटीनंतर अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत; ‘आरोपी जेलमधून...’

Amit Thackeray Meet Balasaheb Sarvade Family : अमित ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यात जेलमधून निवडून येणाऱ्या उमेदवारांवर टीका करत निवडणूक प्रणाली अपयशी ठरत असल्याची खंत व्यक्त केली.
Amit Thackeray
Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 March : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे आज (ता. 30 मार्च) सोलापूर दौऱ्यावर आले होते. महापालिका निवडणुकीदरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची ठाकरे यांनी पुन्हा भेट घेतली. या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी आरोप जेलमध्ये बसून निवडून येतात, हे यंत्रणेचे अपयश आहे, अशी खंत व्यक्त केली.

सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी सोलापुरात तातडीने येत सरवदे कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर सरवदे कुटुंबाच्या भेटीसाठी अमित ठाकरे आज पुन्हा सोलापुरात आले होते.

सरवदे कुटुंबीयांच्या भेटीनंतर अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले, बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला, त्या वेळी मी आलो होतो आणि आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो आहे. आज त्यांच्या मुली आनंदित होत्या, हे पाहून बरं वाटलं.

Amit Thackeray
Amit Thackeray : अमित ठाकरेंनी नीतेश राणेंची हवाच काढली; 'आपण किती पक्ष बदलले, तुमचा बॉस कोण ते अगोदर ठरवा...'

जेलमध्ये बसून आरोपी निवडून येतात, याचा अर्थ हे व्यवस्थेचं अपयश आहे. मुळात आरोपींना निवडणूक लढवता आली नाही पाहिजे. मात्र, जेलमध्ये बसून ते निवडून येतात, अशी खंतही अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली.

Amit Thackeray
Satara SP Leave : साताऱ्यात पुन्हा गोंधळ : SP सक्तीच्या की अर्जित रजेवर?; पवारांच्या नेत्याने तोफ डागली, हा तर तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार...

'पार्थ पवार-राज ठाकरे भेट कशासाठी मला माहिती नाही'

पार्थ पवार-राज ठाकरे भेटीवर अमित ठाकरे यांनी ती भेट कशासाठी होती, हे मला माहिती नाही. मी गेल्यावर राज ठाकरेंशी चर्चा केली. त्यांची काय चर्चा झाली, ते मला माहिती नाही. अशोक खरात प्रकरण पत्रकारांनी शेवटपर्यंत नेले पाहिजे. त्याचा पाठपुरावा सोडू नये, अशी सूचनाही अमित ठाकरेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com