Chandrahar Patal
Chandrahar Patal  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrahar Patil News : चंद्रहार पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ; मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

Rahul Gadkar

Loksabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या समोरील अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची अडचण वाढली असताना आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे.

निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच तालुक्यातील खटाव आणि बेडग येथे आयोजित केलेली पदयात्रा महागात पडण्याची शक्यता आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महाविकास आघाड़ीचे उमेदवार उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील(Chandrahar Patil) यांच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयोगाची परवानगी न घेताच सकाळी साडेनऊ ते दुपारी अड़ीच वाजेपर्यंत दोन गावांमध्ये पदयात्रा काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका चंद्रहार पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल झाल्याने चंद्रहार पाटील अडचणीत येण्याची शक्यता राजकीय तज्ञाकडून व्यक्त केली जात आहे.

बुधवारी त्यांनी तालुक्यातील बेडग आणि खटाव येथे काही कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी हातांमध्ये चंद्रहार पाटलांचे फलक घेऊन प्रचार केला. तसेच विविध ठिकाणी मतदारांच्या भेटीही घेण्यात आल्या. मात्र सदर पदयात्रेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह काही समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सांगलीतील(Sangli) राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. विरोधकांनी षडयंत्र रचून उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT