Sangli Loksabha : चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी काँग्रेस अ‍ॅक्टिव्ह; नाना पटोले यांनी मांडली भूमिका

Loksabha Election : पटोले म्हणाले, एकदा जागावाटप झाल्यानंतर सगळे विसरावे लागते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही हतबल नाही. देशाचे स्वातंत्र्य आणि देशाचे संविधान निर्मितीत काँग्रेसचे योगदान आहे.
Vishal Patil Nana patole Chandrahar Patal
Vishal Patil Nana patole Chandrahar Patal sarkarnama
Published on
Updated on

Sangli Loksabha : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यावर कारवाईबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला जाणार आहे. तेथून जे आदेश येतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत स्पष्ट केले. काँग्रेस कार्यकर्ते चंद्रहार पाटील Chandrahar Patil यांच्या प्रचारात सहभागी होणार की नाही याविषयीदेखील शंका उपस्थित केली जात होती. त्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते सहभागी होतील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Vishal Patil Nana patole Chandrahar Patal
Karmala Politics : आणखी एक माजी आमदार पवारांना साथ देणार; माजी ZP अध्यक्ष, माजी सभापतींसह तुतारी वाजवणार

काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, एकदा जागावाटप झाल्यानंतर सगळे विसरावे लागते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही हतबल नाही. देशाचे स्वातंत्र्य आणि देशाचे संविधान निर्मितीत काँग्रेसचे योगदान आहे. त्यामुळे ते वाचवणे काँग्रेसची जबाबदारी आहे. लोभापेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेसचाच Congress कार्यकर्ता निवडणुकीत पुढे असेल, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishal Patil Nana patole Chandrahar Patal
Mallikarjun Kharge Letter : ...म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!

देशाला कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपने केले आहे. गांधी कुटुंबीयांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम भाजपने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत देशात भाजप येता कामा नये, यासाठी काम करण्याचे आदेश दिले. सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ताकदीने काम करेल. काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आले आहे.

भाजपला रोखणार

काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांच्या भावना समजून घेतल्या. विशाल पाटील यांच्यावर कारवाईचा निर्णय दिल्लीतून होईल. सत्तेचा दुरुपयोग भाजपने केला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्ते कामाला लागतील. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नेहमी स्वातंत्र्यापासून देशाचा विचार करणारी आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ताकदीने प्रचार करतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

R

Vishal Patil Nana patole Chandrahar Patal
Amol Kolhe News : शिवाजीराव आढळराव पाटील डमी उमेदवार; अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com