Sangli News : सांगली जिल्ह्यात सध्या एमडी ड्रग्जचे प्रकरण चांगलेच तापले असून सांगलीचा उडता पंजाबकडे वाटचाल सुरू आहे. यावरून सर्वपक्षीय नेत्यांनी चिंता व्यक्त करताना पोलिस प्रशासनाला धारेवर धरले आहे. अशातच आता जिल्ह्यातील नशाबाजाराची पाळेमुळे उखडून टाकण्याचा निर्धार जिल्ह्या नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पाच जणांच्या टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. ज्याचा दर आठवड्याच्या सोमवारी आढावा घेतला जाणार आहे. या समितीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक आणि अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त असतील.
जिल्ह्यातील वाढत्या नशाबाजारामुळे अनेकांचे आयुष्य वाया जात असून जिल्ह्याचे नाव खराब होत आहे. यावरून सर्व पक्षीय आमदारांनी नशाबाजार, रॅकेट, तरूणांचे नुकसान यावरून आक्रमक भूमिका मांडल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
बैठकीत आमदारांनी प्रशासनावर सवाल उठवत पोलिस दल, अन्न औषध प्रशासन दिवसा झोपा काढतय का असा देखील तिखट सवाल उपस्थित केला. तर आता यात पालकमंत्र्यांनीच लक्ष घालावे अशी विनंती केली होती. त्यावरून कोणत्याही परिस्थितीत सांगलीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, नशामुक्त सांगलीसाठी तीन स्तरावर काम करण्याची गरज असून यात पोलिसांनी महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. पोलिसांनी, आवश्यक सुविधा, प्रोत्साहन पर बक्षीस योजना, समाजाचा सहभाग घ्यावा. यातील दोन व्यवस्था मी पाहिणं. पण आता सांगलीकरांची मोठी जबाबदारी असून त्यांनी साथ द्यावी. जिल्ह्यातील एनजीओंनी पुढे यावे. लोकांनी साथ देत नशाबाजाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
तर नशाबाजारावर फक्त मलमपट्टी करून चालणार नसून यावर योग्य ऑपरेशन करावे लागणार आहे. जे कठोरपणे केले जाईल. जेवढे आम्ही पुण्यासाठी गंभीर तेवढेच सांगलीबाबत आहोत. त्यामुळेच आता शाळांच्या बाहेर असणाऱ्या पानपट्ट्या हटवल्या जात आहेत, असेही पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच आता फक्त नशाबाजारावरच कारवाई करणार असे नाही, तर जे पोलिस कित्येक वर्षांपासून एकाच ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यावर देखील आता कारवाई केली जाणार आहे. असे कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नशा बाजाराला पोषक ठरत आहेत. आता त्यांच्या बदल्या केल्या जातील असे संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
अमली पदार्थाविरोधात आता जिल्ह्यात कारवाई कडक आणि तडक करण्यात येणार आहे. एकीकडे पोलिसांनी खाक्या दाखवायचा आणि दुसरीकडे नेत्यांनी त्यांना सोडवण्यासाठी पुढे व्हायचे हे आता चालणार नसल्याचेही पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर सांगलीला नशामुक्त करण्यासाठी मी दडपण घेणार नाही आणि कोणाचीही गय करणार नाही, असा इशाराच जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांना दिला आहे. तसेच ही मोहीम राजकीय कार्यक्रम नसून ती सामाजिक जबाबदारी असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
सांगलीत राजरोसपणे ड्रग्जचे कारखाने सुरू असल्याचे आता कारवाईनंतर उघड झाले आहेत. यावरून सांगलीचा उडता पंजाब होत असल्याचा बातम्या आल्या होत्या. त्यावरून सर्वपक्षीय आमदारांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी आमदार विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर यांनी, जिल्ह्यात ड्रग्जसह नशेखोरी जोमात सुरू असून तरुणाई बरबाद होत आहे. मात्र अन्न औषध आणि पोलिस प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.