
Sangli News : सांगली जिल्ह्यात नुकताच झालेल्या एका छापेमारीत एमडी ड्रग्जचे प्रकरण उघडकीस आल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात अशा पद्धतीने ड्रग्ज निर्मिती कारखानेच सापडल्याने नेमकं जिल्ह्यात काय सुरू आहे असा सवाल आता नागरीक करत आहेत. विटा येथील कार्वे औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यावर केलेल्या कारवाईत 29 कोटींचे एमडी ड्रग्ज ‘एलसीबी’च्या पोलिसांनी जप्त केल्यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील कारवाई कठोर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी एलसीबीच्या दोन पथकांकडून तपास करत असून पोलिसांच्या रडारवर संशयित एजंट आले असून लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे.
विटा येथील कार्वे औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडस्ट्रीजवर छापा टाकत पोलिसांनी 29 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले. रहुदीप धानजी बोरिचा, सुलेमान जोहर शेख आणि बलराज अमर कातारी अशा तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मात्र तिघांमधील एक विट्याचा असून उर्वरीत दोघे परराज्यातील आहेत. यामुळे सांगलीत नशा पसरवणारे हात बाहेरचे असून यास हातभार जिल्ह्यातील काही लोक लावत आहेत. रहुदीप धानजी बोरिचा हा सूरतचा असून सांगलीत गुजरात कनेक्शन उघड होत आहे. सुलेमान जोहर शेख मुंबईचा आहे. यामुळे येथे मुंबई कनेक्शन देखील उगड होत आहे. धक्कादाक बाब म्हणजे मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ओळख झाल्याचे आता समोर येत आहे.
आता या प्रकरणाची व्याप्ती पोलिसांच्या लक्षात आली असून त्यापद्धतीनमे तपास केला जातोय. सध्या याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडे असून पाच वर्षांपूर्वी सांगलीत ड्रग्ज निर्मिती कारखाना टाकण्याचे ठरवल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान शनिवारी (ता.1) अधिक माहिती व चौकशीसाठी वाढीव पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. त्याप्रमाणे दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, काही एजंटांची नावे समोर आली असून मुंबईसह परजिल्ह्यातील संशयित पोलिसांच्या रडारवर आले आहेत. यांची देखील लवकरच धरपकड केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.
कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये माऊली इंडस्ट्रीज या बंद पडलेल्या कारखान्याचे शेड या कारखान्यासाठी वापरण्यात आले आहे. ते अत्तर उत्पादन करण्यासाठी भाड्याने घेण्यात आले होते. मात्र येथे अत्तरच्या नावाखाली ड्रग्ज तयार केले जात असल्याचे समोर आहे. यामुळे विट्यातील जागा मालकास नोटीस बजावण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर आता सांगलीकरांमध्ये आपल्या पाल्यांच्याबाबतीत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ड्रग्जचे कनेक्शन मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तर या प्रकरणात कोणाची गय करू नका, कठोर कारवाई करा असे त्यांनी पोलिस प्रशासनास सांगितले आहे.
जिल्ह्यात माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील आणि महाविद्यालयीन विद्यार्थांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विद्यार्थांची दप्तर तपासणी मोहीम उघडली जाणार आहे. याबाबत शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची दररोज दप्तर तपासणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे केले आहे. तर ते स्वतः महिन्यातून दोनदा अचानक दप्तर तपासणी करतील असेही त्यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.