Chandrakant Patil : भाजपचे स्वतंत्र नियोजन बैठक, खासदार आमदारांना दिला मास्टर प्लॅन

Kolhapur District Planning Committee : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी (ता.3) झाली. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या आमदार खासदारांची स्वतंत्र बैठक घेतली.
Chandrakant Patil
Chandrakant Patil
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडली. तर भाजपच्या नेत्या आणि राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यादेखील या बैठकीला उपस्थित होत्या. तत्पूर्वी भाजपच्या आमदार खासदारांची स्वतंत्र नियोजन बैठक एका खाजगी हॉटेलमध्ये पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेल्या, आणि नियोजित कामासंदर्भात ही नियोजन बैठक झाली. कोण कोणत्या विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे, शिवाय कोणती कामे केल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होईल, याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. मात्र जिल्हा नियोजन बैठकीपूर्वीच ही नियोजन बैठक झाल्याने सध्या महायुतीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी आधीच भाजपकडून कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक शेजारी असणाऱ्या एका खाजगी हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरच्या सहपालकरमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीवेळी भाजप आमदारांकडून सुचवण्यात येणारी कामे, शिवाय रखडलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमध्ये या बैठकीची उलट सुलट चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूक लागल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच जागा महायुतीकडे गेल्या. यामध्ये शिवसेनेच्या चार, भाजपच्या तीन, जनसुराज्य शक्तीच्या दोन आणि राष्ट्रवादीचे एक जागा विजयी झाली.

Chandrakant Patil
Chandrakant Patil : सांगलीचा उडता पंजाबकडे प्रवास? पालकमंत्र्यांचे दोषींवर कारवाई आदेश

मात्र महायुतीच्या सुत्रानुसार शिवसेनेच्या अधिक जागा असल्याने पालकमंत्री पद शिवसेनेकडे गेले. त्यामुळे नियोजनावर शिवसेनेचेच वर्ष व अधिक राहिले. मात्र शिवसेनेला श्रेय न देता भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी सह पालकमंत्री पद देऊन शिवसेनेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच रविवारी झालेल्या नियोजन बैठकीआधी भाजपने बैठक घेतल्याने जिल्ह्यावर स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Chandrakant Patil
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन हवेत, वर्ष ओलांडूनही विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ‘तारीख पे तारीख’

दरम्यान या बैठकीला केवळ भाजपचे नेते उपस्थित होते यामध्ये, भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर याची प्रमुख उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com