राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘संस्कृती रक्षण सभेला’ उत्तर देण्यासाठी भाजपने सांगलीत ‘इशारा सभा’ घेतली, ज्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या पाच नेत्यांना घेरण्याची घोषणा केली.
पाटील यांनी सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख आणि स्वतःवर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवून चौकशी व आंदोलनाची तयारी दर्शवली.
सभेत त्यांनी आव्हाड यांना डायरी प्रकरणातून इशारा दिला आणि जयंत पाटील यांच्यावर वाशी बाजार समितीच्या गैरव्यवहाराचा उल्लेख केला.
Sangli, 02 October : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘संस्कृती रक्षण सभे’ला भाजपकडून सांगलीत ‘इशारा सभा’ घेऊन खणखणीत उत्तर देण्यात आले. त्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच घेरण्याची रणनीती आखली आहे. पवारांचे पाच नेते अडचणीत आणण्यासाठी पाच प्रमुख नेत्यांवर चंद्रकांतदादांनी जबाबदारी सोपवली आहे. त्यातही आमदार जितेंद्र आव्हाड कोंडी करण्यासाठी खुद्द चंद्रकांत पाटीलच मैदानात उतरले आहेत, त्यामुळे जयंतरावांसह पवारांचे पाच मोहोरे जेरबंद करण्याची तयारी पाटील यांनी चालवली आहे.
सांगलीतील सभेत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) म्हणाले, मी इशाराचा शेवट करायला उभा आहे. अरे म्हणणाऱ्याला कारे म्हटलं पाहिजे, त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी पाहिजे. पाच जणांची जबाबदारी मी करतोय. घाबरलेत ना तर आता त्यांना शेवटापर्यंत नेऊ या. आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहाराची, त्या वेळच्या अध्यक्षांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी मागे लागायचे.
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दर आठवड्याला मंत्रालयात आलं पाहिजे. वेळ पडली तर उच्च न्यायालयात जाऊ आणि हायकोर्टातून आदेश घेऊ. पण, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या गैरव्यहाराची चौकशी होणार, असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.
सम्राट महाडिक यांनी सर्वोदय सहकारी साखर कारखान्यासाठी जीवाचं रान करायचं. सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही, हे बघू, असे सांगून सर्वोदय कारखान्याची फाईल सम्राट महाडिक यांनी बघायची असे पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कुठे आहेत पृथ्वीराज? अजून एखादा महिना मी महसूल मंत्री राहिलो असतो तर काम झालं असतं. तुला ती रात्र आठवत असेल की पहाटे चारपर्यंत आपण जागा होतो. लॉटरीच्या ऑनलाईन घोटाळ्याची जबाबदारी सत्यजित देशमुख यांच्यावर असणार आहे. सगळं खणयाचं, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांना दिला आहे.
ठाणे जिल्ह्यात एक बिल्डर गेला, त्याच्या डायरीमध्ये कोणाचं तरी नाव होतं आणि ते शिरा ताण ताणून बोलत होते. सगळ्या बहुजन समाजाचा ठेका त्यांनीच धेतला आहे, असं त्यांना वाटतं. त्याचं नाव होतं. डायरी आहे, मला माहिती आहे ती कोठे आहे ती? आम्ही काय गोट्या खेळतोय का? त्यामुळे त्याचं काम मीच घेतो माझ्या अंगावर, असे सांगून नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला.
मला जयंतराव म्हणाले, ही सभा होऊ नये, असं मला वाटत होतं. पण माझ्या एका नेत्याने दबाव आणला आणि सगळ्यांना इथं आणला. नका आता वाढवू. मग हा भरीस घालणारा नेता आहे, तो वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहारात आहे. त्यांच कोणाचं तरी एकाचं काम करू, त्यासाठी मला कोणाचे तरी नाव सूचवा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे
प्रश्न 1 : ‘इशारा सभा’ कोठे झाली?
सांगलीत.
प्रश्न 2 : चंद्रकांत पाटील यांनी कोणत्या पक्षाच्या नेत्यांना घेरण्याची तयारी दाखवली?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).
प्रश्न 3 : जितेंद्र आव्हाड यांना कोणत्या प्रकरणावरून इशारा दिला?
एका बिल्डरच्या डायरी प्रकरणावरून.
प्रश्न 4 : वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहाराचा उल्लेख कोणाबाबत करण्यात आला?
जयंत पाटील यांच्याबाबत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.