Chandrakant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन हवेत, वर्ष ओलांडूनही विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ‘तारीख पे तारीख’

Sub-centre of Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतील खानापूर तालुक्यात प्रस्तावित आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले होते.

Aslam Shanedivan

Sangli News : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतील खानापूर तालुक्यात प्रस्तावित आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे तात्कालिन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सध्याचे पालकमंत्री यांच्या शब्दाला वजन आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतील खानापूर तालुक्यात होईल असा ठराव गेल्या वर्षी विद्यापीठाच्या अधिसभेत झाला होता. या गोष्टीला आता एक वर्ष होत आहे. तर या केंद्राच्या स्थापनेसाठी चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले होते. त्यांनी उपकेंद्राच्या स्थापनेचा निर्णय फक्त दोन मिनिटांत घेऊ असे म्हटले होते. मात्र आता वर्ष होत असून पालकमंत्री आता यात लक्ष घालणार का? विद्यापीठ उपकेंद्राच्या उभारणीस गती मिळणार का? असे सवाल आता सांगलीकर उपस्थित करत आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी सांगलीत गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन कुलगुरू आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याबाबत ग्वाही दिली होती. तर याबाबत विद्यापीठाच्या अधिसभेत ठराव ही करण्यात आला होता. या ठरावाप्रमाणे विद्यापीठाचे हे उपकेंद्र खानापूर तालुक्यात शंभर एकर जागेवर होणार आहे. यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

तर प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवला आहे. त्यास विद्यापीठाने मंजूर दिली असून पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. पण तो अद्याप लाल फितीतच अडकला आहे. राज्य शासनाकडून यावर अद्याप उत्तर आलेले नाही

आता तर पाटीलच पालकमंत्री?

गेल्या वर्षी आश्वासन देताना चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. त्यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठाकडून सांगलीला उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आल्यास दोन मिनिटांत मंजूर करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही यावर कोणत्याही हलचाली झाल्या नाहीत. एक वर्ष प्रस्तावाची फायईल राज्य शासनाकडे पडून आता. पण आता पालकमंत्रिपदाची सूत्रेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे आल्याने आतातरी हा प्रश्न मार्गी लागणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

उपकेंद्राची कशासाठी हवे?

शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा असे तीन जिल्हे येत असून सांगली जिल्ह्यामधील 87 महाविद्यालये यात येतात. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञानसह इतर महाविद्यालयांचा समावेश आहे. ज्यात 63 हजार 570 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील काही भौगोलिक भाग हा दुष्काळी असून या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात जावे लागते. जे परवडणारे नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि वेळेचा अपव्यय होते. यामुळे खानापूर येथे उपकेंद्र झाल्यास सांगलीसह सातारा जिल्ह्यातील काही महाविद्यालयांसाठीही ते उपयुक्त ठरते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT