Solapur News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी आडममास्तरांनी चंद्रकांतदादांना आपल्या घरावर लावलेला कोयता-हातोडा दाखवला. त्यावेळी चंद्रकांतदादांनी ‘कोयता हातोडा सोडायचाच नाही,’ असे म्हटले, त्यावर शांत राहतील ते आडममास्तर कसले, त्यांनीही चंद्रकांत पाटील यांना मिश्किल उत्तर दिले. (Chandrakant Patil's visit to Narsayya Adam's house)
सिद्धरामेश्वराच्या यात्रेतील लग्न सोहळ्याचा काल दिवस होता. त्या सोहळ्याला राज्यभरातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यासोबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक अमर साबळेही होते. अक्षता सोहळ्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कुंभारी येथील रे-नगरमधील घरांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळाची, तसेच हेलिपॅडची पाहणी केली. या रे नगरमधील कामगारांच्या घरासाठी माजी आमदार नरसय्या आडम यांनीच पुढाकार घेतलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रे-नगरमधील घरांची पाहणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या घरी भेट दिली. त्या वेळी आडममास्तरांनी चंद्रकांतदादांना आपले घर दाखवले. घरावरील कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह कोयता हातोडाही दाखवला. त्याचवेळी चंद्रकांतदादांनी कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नरसय्या आडममास्तरांना उद्देशून ‘कोयता-हातोडा सोडायचा नाही’ म्हटले. चंद्रकांतदादांचा रोख ओळखून आडममास्तरांनीही हजरजबाबी उत्तर दिले.
‘तुम्ही आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) सोडणार नाही; मी कोयता हातोडा सोडणार नाही,’ असे स्पष्टपणे सांगून टाकले, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, आडममास्तरांनी आपल्या उत्तरातून आपण शेवटपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.
आडममास्तरांची पक्षनिष्ठा
सोलापुरातील कामगारांच्या घराxचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी माजी आमदार आडम हे मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर गेले होते. तसेच, भाषणातून त्यांनी मोदींचे कौतुक केले होते. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना केंद्रीय समितीमधून निलंबित केले होते. कारवाई होऊनही आडम हे पक्षासोबत एकनिष्ठ राहिले होते.
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.