Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News : बावनकुळेंचं मोठं विधान; 'राज्यात 2019 प्रमाणेच...'

Sangli BJP Politics : 'गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील बरीच विकास कामे मार्गी लावली.'

Anil Kadam

Sangli News : आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात २०१९ च्या वेळापत्रकाप्रमाणे होतील असा अंदाज आहे. मात्र, निवडणूक कधीही जाहीर झाली तरी भाजप व मित्र पक्ष त्यासाठी सज्ज असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सांगली भाजप महायुतीच्या लोकसभा निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, सांगलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले याचा अर्थ लगेचच निवडणूक जाहीर होईल असे नाही. पण महाराष्ट्रात २०१९ च्या प्रमाणेत आगामी लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक असेल असा अंदाज आहे. भाजप व मित्र पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज आहेत. देशात गेल्या ६५ वर्षात केंद्र सरकारकडून जनतेला जे अपेक्षित काम होतं ते झाले नाही. मात्र, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यातील बरीच विकास कामे मार्गी लावली. त्यामुळे नरेंद्र मोदींची गॅरेंटीच आम्हाला येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत विजयी केली.

मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेच्या विकास कामांंची शिदोरी घेवून आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे. जनतेच्या मतांचे आमच्यावरील कर्ज पुन्हा सत्तेत आल्यावर विकास कामांच्या माध्यमातून फेडू. यासाठीच या निवडणुकीत जाहीरनामा काय असावा, कोणती कामे जनतेला केंद्र सरकारकडून अपेक्षीत आहेत याबाबत जनतेकडून सुचना मागवण्यात आल्या असून यासाठी नमो ॲप सुरु केले असून त्यावर जनतेने आपल्या सुचना नोंदवाव्यात, असे अवाहन बावनकुळे यांनी केले.

देशमुख, जगतापांनी फिरवली पाठ

सांगलीत भाजपकडून लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh) इच्छुक आहेत. पण पक्षाचे प्रचार कार्यालय खा. पाटील यांच्या गणपती संघाच्या कार्यालयात सुरु करण्यात आले. त्यामुळे खा. पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र या कार्यालयाच्या उदघाटनाला पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, माजी आमदार विलासराव देशमुख, राजेंद्रअण्णा देशमुख यांनी गैरहजेरी लावल्याने भाजप मधील गटबाजी दिसून आली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT