Prithviraj Deshmukh : खासदार संजय पाटलांची डोकेदुखी वाढणार; पृथ्वीराज देशमुखांनी ठोकला शड्डू

lok sabha Election 2024 : सांगलीच्या जागेचा निर्णय घेताना जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेवून उमेदवारी दिली जाईल. पक्षाकडून माझ्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल
sanjay Patil, Prithviraj Deshmukh
sanjay Patil, Prithviraj Deshmukh sarkarnama
Published on
Updated on

अनिल कदम

Sangli : सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार संजय पाटील आहेत. पाटील पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपकडूनच तिकीट मिळवण्यासाठी आता चुरस वाढली आहे. कारण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.

लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेऊन निवडणूक ताकदीने लढविली जाईल, अशी भूमिका माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्पष्ट केली. रांजणीतील ड्रायपोर्ट झाला पाहिजे, जिल्ह्यात फळबागशेती वाढत असल्याने ड्रायपोर्टच्या अडचणी सोडविण्याची गरज आहे. याशिवाय जिल्ह्यात विमानतळ गरजेचे असून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, देशमुख यांच्या या निर्णयाने विद्यमान खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यासह भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र दिसते.

sanjay Patil, Prithviraj Deshmukh
Prithviraj Chavan : शिवसेनेचा झाला आता 'राष्ट्रवादी'चा निकाल काय? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती. त्यावेळी मला थांबण्याची विनंती करीत पुढीलवेळी विचार करू, असे सांगण्यात आले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आदेश मानून गतवेळी थांबलो. दावेदार असताना माघार घेऊन पक्षाचे काम उमेदवाराच्या पुढे जावून केले होते. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी मी इच्छुक असून पक्षाकडे तिकीटाची मागणी केली आहे. सांगलीच्या जागेचा निर्णय घेताना जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेवून उमेदवारी दिली जाईल. पक्षात दबावाने तिकीट दिले जात नाही. त्यामुळे पक्षाकडून माझ्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

शेतीला उद्योगाची जोड मिळाल्यास सांगली जिल्हा पहिल्या क्रमांकावर जाईल. सांगलीतील औद्योगिक वसाहतीला बळ मिळाले नाही, त्यामुळे नवे उद्योग व्यवसाय सांगलीऐवजी कोल्हापूरकडे वळले. नॅशनल हायवेमुळे जिल्ह्याचा फायदा झाला आहे. त्याचा उपयोग भविष्यातील उद्योग वाढीसाठी झाला पाहिजे. राष्ट्रीय रस्त्यांचा उपयोग थेट सांगलीशी कनेक्टव्हिटी जोडण्यासाठी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विमानतळ, ड्रायपोर्ट विकासाचे केंद्र

विमानतळ आणि ड्रायपोर्ट हे जिल्ह्याच्या विकासाचे केंद्र आहे, त्यादृष्टीने कामे होणे गरजेचे होते, परंतु दोन्ही कामे झाली नसल्याबाबतची खंत माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केली. ड्रायपोर्ट आणि विमानतळामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. सांगलीतील विमानतळासाठी 160 एकर जागा उपलब्ध आहे, अद्याप 260 एकर जागा अधिग्रहण करणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हीटी वाढीसाठी दोन्हीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited By Roshan More)

sanjay Patil, Prithviraj Deshmukh
Nashik Politics : मोदींचा दौरा होताच नाशिकमध्ये महायुतीत रंगली वर्चस्वाची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com