Ahmednagar OBC Rally  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar OBC Rally : नगरमध्ये 'OBC'ची जंगी सभा घ्या, भुजबळांना नेत्यांचे साकडे...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेंनी अटीतटीच्या लढाई पुकारली आहे, तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेत ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि नेत्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे.

आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या राज्यभरात सभा सुरू आहेत. यातच मंत्री छगन भुजबळ यांची नगरमध्ये सभा व्हावी, याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी छगन भुजबळ यांच्या भेटीला आज नगरमधील ओबीसी घटकातील सर्व नेते, पदाधिकारी रवाना झाले आहेत. तब्बल 40 जणांचे शिष्टमंडळाचा यात समावेश आहे. (Latest Marathi News)

आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात टोकाचे वाक्-युद्ध सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या जागृतीवर राज्यभर दौरे सुरू आहेत. आता मराठा आरक्षणासाठी मुंबईत मराठा समाजाला घेऊन मनोज जरांगे धडकणार आहेत. तिथे आंदोलन करणार आहे. तब्बल तीन कोटी मराठा घेऊन मुंबईत धडकणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यानुसार मनोज जरांगे आणि मराठा समाजाची तयारी सुरू आहे. मनोज जरांगे हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागत आहेत. असे असताना ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते हे मराठा समाजाला स्वतंत्र आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठी ओबीसीच्या राज्यभर सभा होत आहे. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. मंत्री भुजबळ यांच्या शाब्दिक बाण भाल्यासारखे मनोज जरांगेंवर वार करत आहेत. त्याचपद्धतीने जरांगे हे देखील आक्रमक भाषा वापरत भुजबळांना सुनावत आहेत. भुजबळ आणि जरांगे यांच्यात टोकाचे शाब्दिक वाक्-युद्ध रंगले आहे.

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांची नगरमध्ये सभा व्हावी, यासाठी नगरमधील ओबीसी नेते, पदाधिकारी यांनी कंबर कसली आहे. नगरमधील तब्बल ४० जणांचे शिष्टमंडळ हे मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला आज नाशिककडे रवाना झाले आहे. बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, शरद झोडगे, अंबादास गारूडकर, अर्जुनराव बोरुडे, सुनील भिंगारे, प्रकाश सैंदर यांच्यासह ओबीसीतील सर्व घटकांचे पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.

मंत्री छगन भुजबळ यांची दुपारी नाशिक येथे भेट झाल्यानंतर सभेची तारीख आणि त्यानंतरचे नियोजन यावर चर्चा होईल, असे सांगण्यात आले. नगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मनोज जरांगे यांच्या सभा झाल्या आहेत. परंतु ओबीसी नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांची आणि ओबीसी नेत्यांची सभा झालेली नाही. मंत्री भुजबळ यांनी सभेची तयारी दर्शवल्यास, नगरमध्ये ती सभा कोठे आणि कधी होईल, याची उत्सुकता असणार आहे.

नगर जिल्ह्यात मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज मोठा आहे. हा समाज विस्तारलेला आहे. ओबीसी समाज नगर जिल्ह्यात संघटीत झाल्यास मतपेटीवर परिणामकारक ठरणार आहे. आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजाने जगोजागी आंदोलने केली. या आंदोलनाला ओबीसी समाज, नेते, पुढारी यांनी देखील पाठिंबा दिला.

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका ओबीसी समाजाने दाखवली. परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. या आरक्षणाच्या लढाईत काही ठिकाणी मराठा-ओबीसी यांच्यात संघर्ष देखील झाला. आता नगरमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांची सभेची तयारी सुरू केल्याने आरक्षणाच्या लढाईला धार येणार असे दिसते आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT