Devendra Fadnavis-Sachin Kalyanshetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis Solapur Tour : फडणवीसांनी नाकारला आपल्या प्रिय आमदाराचा पुष्पगुच्छ; कारणही आले पुढे! (Video)

Sachin Kalyanshetti News ; मुख्यमंत्री फडणवीस हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यात ते सोलापूरहून तुळजापूरला गेले, तेथून ते हेलिकॉप्टरने पंढरपूरमध्ये आले आहेत. पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन आणि त्यानंतर मंदिराच्या कामाची पाहणी करून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाड्यावर जाणार आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 March : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. 29 मार्च) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईहून सकाळी साडेदहाला सोलापूरच्या विमानतळावर उतरलेले मुख्यमंंत्री फडणवीस यांचे प्रशासनाच्या वतीने सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी स्वागत केले. विमानातून खाली उतरलेल्या फडणवीसांचे माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी गुलाब पुष्प देऊन प्रथम स्वागत केले. त्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ पुढे केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रिय आमदाराचा तो पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, कल्याणशेट्टींचा पुष्पगुच्छ नाकारण्याचे कारणही पुढे आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यात ते सोलापूरहून तुळजापूरला गेले, तेथून ते हेलिकॉप्टरने पंढरपूरमध्ये आले आहेत. पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन आणि त्यानंतर मंदिराच्या कामाची पाहणी करून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाड्यावर जाणार आहेत, त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

तत्पूर्वी, शनिवारी (ता. 29 मार्च) सकाळी सोलापूरच्या विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), आमदार देवेंद्र कोठे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे प्रमुख नेते उपस्थित होते.

विमानातून खाली उतरलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी प्रथम गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, त्यानंतर स्वागतासाठी उभे असलेल्या कल्याणशेट्टी यांनी हातातील पुष्पगुच्छ फडणवीसांना देऊ केला. मात्र, फडणवीस यांनी पुष्पगुच्छ स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला, त्यामुळे आमदार कल्याणशेट्टी यांचा चेहरा पडला.

फडणवीस यांनी पुष्पगुच्छ नाकारण्याचे कारणही पुढे आले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणू नये, असे आवाहन केले होते. खुद्द नागपुरात गेल्यानंतरही फडणवीसांनी पुष्पगुच्छ स्वीकारले नव्हते. त्याऐवजी स्वागतासाठी एक गुलाबपुष्प आणावे, असे फडणवीसांनी सांगितले होते, त्यामुळेच सोलापूरच्या विमानतळावरही आपल्या प्रिय आमदाराचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यास फडणवीसांनी नकार दिला.

त्या पुष्पगुच्छातील एक फूल स्वीकारून फडणवीसांनी कल्याणशेट्टी यांच्या स्वागताचा स्वीकार केला. विशेष म्हणजे स्वागतासाठी आलेल्या बहुतांश नेत्यांनीही एक गुलाबपुष्प आणले होते, काहींनी पुस्तक आणले होते. विशेष म्हणजे नव्याने आमदार झालेले देवेंद्र कोठे यांनीही स्वागतासाठी एकमेव गुलाबपुष्छच आणले होते, त्यामुळे कल्याणशेट्टी यांचा पुष्पगुच्छ नाकारल्याची एकच चर्चा सोलापूरमध्ये सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT