Eknath Shinde | Shahaji Bapu Patil Latest News
Eknath Shinde | Shahaji Bapu Patil Latest News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संजय राठोडांना मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी न्यायच केला...

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : गेले अनेक दिवस शिंदे सरकाराचा बहुचर्चीत असलेला मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी (ता.९ ऑगस्ट) पार पडला आहे. त्यामध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनाही स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून भाजप (BJP)आणि शिंदे गटाविरोधात जोरदार टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी राठोडांना मंत्रीपद देऊन न्यायच केला, अशी भूमिका शिंदे गटाचे सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनी व्यक्त केली आहे. (Eknath Shinde, Shahaji Bapu Patil Latest News)

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार मंगळवारी तब्बल ३९ दिवसांनी पार पडला आहे. यामध्ये शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनाही यामंत्रीमंडळ विस्तारात जागा देण्यात आली असून त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

महाविकास आघाडीत मंत्री असतांना भाजपनेच त्यांच्यावर आरोप करून त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता शिंदे गटासोबत नवं सरकार स्थापन केल्यावर त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. यावरून विरोधकांकडून भाजपला लक्ष केलं जात आहे. दरम्यान शहाजीबापू पाटील यांनी शिंदेंची बाजू मांडत त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली संधीचे समर्थन केलं आहे.

शहाजीबापू म्हणाले की, राजकारणामध्ये अनेकदा नेत्यांवर विविध आरोप होत असतात. तसेच राठोड यांच्यावरही ते झाले होते. मात्र, याप्रकरणात त्यांना पोलिसांना क्लिनचीट दिली आहे. कोणता आरोप राजकीय नेत्यावर असला आणि पोलिसांनी त्यास क्लीनचीट दिलेली असल्यास त्या नेत्याच राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोडांबाद्दल जो निर्णय घेतला तो न्याय देणारा आहे, असे शहाजीबापू यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये न्यायालयात वाद सुरू असताना शहाजीबापूंनी शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं असून यामुळे धनुष्यबाण चिन्हं देखील आम्हालाच मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. तसेच राज्यघटनेप्रमाणे ज्या बाजूला बहुमत असते त्या बाजूलाच चिन्ह मिळतं असते. त्यामुळे आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने आम्हालाच चिन्ह मिळेल, असा विश्नास व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे हे कष्टाळू मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले असून संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांना आशीर्वाद देत आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT