Chinchwad Gram Panchayat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chinchwad Gram Panchayat: चिंचवाडमध्ये राडा, उमेदवारांचे प्रतिनिधी बूथमध्येच भिडले...

Kolhapur News : ग्रामपंचायत उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांकडे बघितलेच्या कारणावरून एकमेकांच्या विरोधात भिडले.

Rahul Gadkar

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील खास करून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतमधील निवडणूक नेहमीच संघर्षाची राहिली आहे. या मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे.

दक्षिणमधील चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत याचा प्रत्यय यंदाही आला. टोकाच्या संघर्षामुळे मतदान केंद्राच्या खोलीतचं उमेदवार प्रतिनिधी एकमेकांना भिडले. पोलिसांनी माध्यमांना कॅमेऱ्यांनी बाचाबाची शूट करण्यास विरोध केला.

एकमेकांना अपशब्द वापरत शिव्यांची लाखोली पोलिसांच्या समोरच वाहिल्या जात असल्याचा प्रकार घडला. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने हा प्रकार चिघळला. करवीर तालुक्यातील चिंचवाड या ग्रामपंचायतीत निवडणुकीत आज उमेदवार प्रतिनिधींमध्येच राडा झाल्याचा प्रकार घडला. मतदान केंद्रातील खोलीमध्येच उमेदवार प्रतिनिधींची राजकीय ईर्षा त्याला कारणीभूत ठरली.

ग्रामपंचायत उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांकडे बघितलेच्या कारणावरून एकमेकांच्या विरोधात भिडले. दोन परस्पर विरोधी प्रतिनिधींनी मतदान केंद्राच्या खोलीतच राडा घातल्याने चिंचवाडमधील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. उमेदवार प्रतिनिधीला बाहेर काढल्यानंतर संबंधित प्रतिनिधीने अन्य कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली. या वेळी मोठा तणाव निर्माण झाला. दोन्हीही कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या दोन्हीही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून हाकलून दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १२ ग्रामपंचायतींसाठीच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी 1 हजार 540 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 1 हजार 382,सरपंच पदासाठी 192 व 74 पोटनिवडणुकीसाठी 66 निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका

कोल्हापूरच्या चिंचवाड येथील केंद्रावर तणाव निर्माण झाला आहे. उमेदवार प्रतिनिधी जोरदार शिवीगाळ आणि बाचाबाची झाली. मतदान केंद्रातच जोरदार शाब्दिक चकमक येथील वातावरण तापले आहे. उमेदवार प्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार या ठिकाणी घडला. मात्र, या प्रकारावर गांधीनगर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. माध्यमांचा कॅमेऱ्यांनी बाचाबाची शूट करण्यास पोलिसांनी विरोध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT