Cloth woven Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Mandir News : सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट... श्रीरामांच्या मूर्तीला सोलापुरात विणलेले वस्त्र घालणार...

Solapur's Cloth For Shri Ram : प्रभू रामांना आपण विणलेले वस्त्र घालण्यात येणार आहे, याचे सोलापूरकरांना मोठे अप्रूप वाटत आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन येत्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला सोलापूरकरांनी हातांनी विणलेले वस्त्र घालण्यात येणार आहे. ही संपूर्ण सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, त्यामुळे सोलापूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. (Cloth woven in Solapur will be worn on the idol of Lord Rama in Ayodhya)

अयोध्येत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिर उभारण्यात आले आहे. त्या मंदिराचे उद्‌घाटन येत्या २२ जानेवारीस होणार आहे. त्याचदिवशी मंदिरात प्रभू श्रीराम आणि इतर मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्या मूर्तीला सोलापूरकरांनी विणलेले वस्त्र घालण्यात येणार आहे. प्रभू रामांना आपण विणलेले वस्त्र घालण्यात येणार आहे, याचे सोलापूरकरांना मोठे अप्रूप वाटत आहे. त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने नागरिक वस्त्र विणत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला घालण्यात येणारे वस्त्र विणण्याचा ‘धागा विणूया श्रीरामासाठी’ हा उपक्रम पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. सोलापूरच्या पूर्व भागातील पंचमुखी हनुमान मंदिरात हे वस्त्र विणण्यात येत आहे. हा उपक्रम १४ जानेवारीपर्यंत सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे सर्व सोलापूरकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन निरुपणकार विवेक घळसासी यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी सोलापुरातील स्वामी विवेकानंद केंद्राने पुढाकार घेतला आहे. सोलापूरचे हे वस्त्र थेट अयोध्येला जाणार आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोशाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देव गिरी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

वालचंद शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. रणजित गांधी, आमदार सुभाष देशमुख, घळसासी, उद्योजक व केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, स्त्रीरोगतज्ञ डॉ. शोभा शहा, दिलीप पेठे आदींच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT