Sule Meet Thopte : थोपटे पिता-पुत्रांची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट; पाऊण तास लोकसभेसंदर्भात चर्चा?

Baramati Loksabha Election : मागील पाच वर्षांत एकमेकांना कधीही न भेटलेले आणि एकमेकांवर टीका करायची एकही संधी न सोडणारे सुळे आणि थोपटे यांच्या या भेटीची पुणे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
Supriya Sule-Sangarm Thopte-Anantrao Thopte
Supriya Sule-Sangarm Thopte-Anantrao ThopteSarkarnama
Published on
Updated on

Bhor News : माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. ५ जानेवारी) भेट घेतली. सुप्रिया सुळे आणि थोपटे पिता-पुत्रांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. ही चर्चा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झाल्याचे समजते. मागील पाच वर्षांत एकमेकांना कधीही न भेटलेले आणि एकमेकांवर टीका करायची एकही संधी न सोडणारे सुळे आणि थोपटे यांच्या या भेटीची भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. (MP Supriya Sule meet Thopte Father and Son)

विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायकल वाटप आणि शहरातील व्यापाऱ्यांसमवेत बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी सकाळी भोरमध्ये आल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी हे दोन्ही कार्यक्रम उरकून थेट थोपटे यांचे घर गाठले. त्या ठिकाणी त्यांनी आमदार संग्राम थोपटे व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. थोपटे पिता पुत्र आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि आगामी लोकसभा निवडणूक पाहता या तिघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule-Sangarm Thopte-Anantrao Thopte
Shoumika Mahadik : सतेज पाटलांच्या साम्राजाला चॅलेंज करणाऱ्या : शौमिका महाडिक

अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले असून ते भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती करून आगामी निवडणुका लढवणार आहेत. दुसरीकडे, शरद पवार यांची राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत. आता सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे हे महाविकास आघाडीत एकत्र आहेत. मात्र, मागील पाच वर्षांत ते एकदाही सार्वजनिक कार्यक्रम एकत्र आलेले नाहीत, त्यामुळे आजच्या भेटीचे सर्वांना कुतूहल आहे.

लोकसभा आणि विधानसभेची मागील निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून लढवली होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे काम केले नाही, असा आरोप दोन्ही काँग्रेसकडून होत आहे. याशिवाय खासदार आणि आमदार असूनही ते एकाही कार्यक्रमाला ते एकत्र आले नव्हते. त्या निवडणुकीत काँग्रेस आणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी एकमेकांचे काम केले नाही.

Supriya Sule-Sangarm Thopte-Anantrao Thopte
Suresh Warpudkar Welcome : सडलेले धान्य देऊन केले आमदार सुरेश वरपुडकरांचे स्वागत

खासदार सुळे आणि आमदार थोपटे यांनी मतदारसंघातील अनेक कार्यक्रम स्वतंत्रपणे केले आहेत. त्या प्रत्येक कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांवर टीका केलेली आहे. एकाच कामाचे दोन वेळा भूमिपूजन आणि उद्‌घाटनही या दोघांनी केले आहे. त्यामुळे आजच्या भेटीत काय रणनीती ठरली आहे. आमदार थोपटे आघाडी धर्म पाळणार का? आमदार आणि खासदार एकमेकांचा प्रचार करणार का? आणि मागील काळात झालेल्या टीका विसरुन पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा रंगली आहे. या भेटीनंतरही आमदार संग्राम थोपटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Supriya Sule-Sangarm Thopte-Anantrao Thopte
Sangola Politics : गणपतआबांच्या नातवांच्या मनात तरी काय? डॉ. अनिकेतनंतर बाबासाहेबांनीही घेतली पवारांची भेट

मागील निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना भोर विधानसभा मतदारसंघात संघर्ष करावा लागला होता. आता तर अजित पवार बाहेर पडल्याने पक्षाची ताकद कमी झाली आहे. अशा वेळी सुळे यांना थोपटे यांच्या मदतीची निकड आहे. लोकसभेच्या निवडणुकाच्या संदर्भाने खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार थोपटे यांची भेट घेतल्याची चर्चा पुणे जिल्ह्यात सुरु आहे.

Edited By : Vijay Dudhale

Supriya Sule-Sangarm Thopte-Anantrao Thopte
Maratha Reservation Survey : बीडमधील खुल्या प्रवर्गातील पावणेतीन लाख कुटुंबाचे होणार सर्वेक्षण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com