Sharad Pawar-Prithviraj Chavan  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Satara Tour : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केले शरद पवारांचे स्वागत...

सरकारनामा ब्यूरो

NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (ता. ३ जुलै) साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते आपले गुरु आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी पवार यांचे सातारा प्रवासादरम्यान ठिकठिकाणी प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे पवारांचे विरोधक म्हणून ओळख असणारे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही पवारांच्या स्वागतासाठी हजर होते. (Congress Former Chief Minister Prithviraj Chavan welcomed Sharad Pawar)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी बंड करून शिवसेना आणि भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतरही पवारांनी न डगमगता लढण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल आपण साताऱ्यात (Satara) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे स्पष्ट केले हेाते. त्यानुसार आज शरद पवार हे चव्हाण यांच्या दर्शनासाठी कराडमधील प्रीतीसंगमावर पोचले आहेत. साताऱ्यात आल्यानंतर पवार यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार अरुण लाड, आमदार मकरंद पाटील, आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण या राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही उपस्थित होते. या सर्वांनी प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.

शरद पवार हे काँग्रेसमध्ये असताना पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरसुद्धा राज्यात चव्हाण हे पवारविरोधक म्हणून ओळखले जाते. पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. तसेच, काही दिवसांपूर्वीही शरद पवार यांनी चव्हाण यांना चिमटा काढला होता. त्यानंतरही अजित पवारांच्या बंडानंतर खुद्द पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT