NCP News : आजच्या या घडामोडीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या, असा गौप्यस्फोट मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी केला. (Ajit Pawar was wished two months ago: Rajan Patil's secret blast)
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दुपारी उमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आमदार भुसार यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
राजन पाटील (Rajan Patil) म्हणाले की, अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य असून, आम्ही त्यांचे स्वागतच करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा देशात सक्षम दुसरा नेता नाही, त्यांनी देशाला मानाचे स्थान मिळवून दिले आहे, हे आम्ही मागेच सांगितलं होतं.
रविवारी (ता. २ जुलै) दिवसभरात चाललेल्या राजकीय घडामोडींबाबत माजी आमदार राजन पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, मोहोळचे आमदार यशवंत माने हेही अजित पवार यांच्या बरोबरच आहेत. आम्हीही भाजप-शिवसेना सरकारबरोबरच असल्याचा दावाही पाटील यांनी केला.
दरम्यान, विरोधी सरकार असल्यामुळे मोहोळ तालुक्याचा बराचसा विकास थांबला होता. तो आता चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वासही माजी आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.